महिलेचा मृतदेह आढळला

By Admin | Updated: September 28, 2014 23:51 IST2014-09-28T23:30:26+5:302014-09-28T23:51:31+5:30

कनेरगाव नाका : विदर्भ- मराठवाडा सीमेवरील देवठाणा खडसे गावाच्या शिवारात रविवारी दुपारी २ वाजता अंदाजे ४० वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आला.

The body of the woman was found | महिलेचा मृतदेह आढळला

महिलेचा मृतदेह आढळला

कनेरगाव नाका : विदर्भ- मराठवाडा सीमेवरील देवठाणा खडसे गावाच्या शिवारात रविवारी दुपारी २ वाजता अंदाजे ४० वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आला.
कनेरगावनाका ते पैनगंगा रेल्वेस्थानकादरम्यान विजयानंद किशनराव पाईकराव यांच्या शेतात सदर मृतदेह आढळला असून याबाबत माहिती मिळताच वाशिम ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय परेदशी, जाधव, जमादार संजय आमटे यांनी घटनास्थळी भेट दिली.
दगडफेकप्रकरणी गुन्हा
हिंगोली : शहरातील गवळीपुरा भागात २७ सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास दगडफेक झाल्याची घटना घडली. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.याबाबत स्वप्नील चंद्रकांत परसवाळे यांनी पोलिसांत फिर्याद दिली. गवळीपुरा भागातील रहिवासी एकत्र आल्यानंतर आपआपल्या घरी जात असताना कुणीतरी दगडफेक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तपास ढाकरे करीत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: The body of the woman was found