बेपत्ता तरुणीचा मृतदेह सापडला
By Admin | Updated: September 25, 2016 23:59 IST2016-09-25T23:55:50+5:302016-09-25T23:59:20+5:30
पारध : भोकरदन तालुक्यातील वालसावंगी येथील १६ वर्षीय युवती २३ सप्टेंबर रोजी बेपत्ता झाल्याची तक्रार पारध पोलीस ठाण्यात मुलीच्या मावशीने केली होती.

बेपत्ता तरुणीचा मृतदेह सापडला
पारध : भोकरदन तालुक्यातील वालसावंगी येथील १६ वर्षीय युवती २३ सप्टेंबर रोजी बेपत्ता झाल्याची तक्रार पारध पोलीस ठाण्यात मुलीच्या मावशीने केली होती. मात्र, सदर युवतीचा मृतदेह रविवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास एका विहिरीत तरंगताना ग्रामस्थांना आढळून आला.
मनीषा देविदास निकाळजे (१६) हिचे आई-वडील मयत झालेले असल्याने ती हिरा प्रकाश काकफळे या तिच्या मावशीकडे वालसावंगी येथे राहत होती. शुक्रवारी शौचास जाते असे मावशीला सांगून ती घरातून बाहेर पडली. मात्र, बराच वेळ होऊन देखील ती घरी परतली नाही. तिच्या नातेवाईकांनी शोधाशोध करुन देखील ती सापडली नाही. अखेर त्याच दिवशी रात्री तिच्या मावशीने ती बेपत्ता झाल्याची तक्रारी पारध पोलिसांकडे नोंदविली होती. त्यानंतर तिचा पोलिसही शोध घेत होते. अखेर रविवारी मनीषाचा मृतदेह वालसावंगी येथील विश्वनाथ सपकाळ यांच्या शेतातील विहिरीत तरंगताना काही ग्रामस्थांना दिसला. तशी माहिती पारध पोलिसांना देण्यात आली. त्यानुसार पारध ठाण्याचे स.पो. नि. सुदाम भागवत, पवार, जाधव यांनी पंचनामा केला. (वार्ताहर)