रेल्वेत आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह
By Admin | Updated: December 4, 2014 00:52 IST2014-12-04T00:28:33+5:302014-12-04T00:52:20+5:30
परतूर: काचीगुडा- मनमाड या पॅसेंजर रेल्वेमध्ये एका साठ वर्षिय इसमाचा मृतदेह आढळला. त्याच्या अंगावर लालसर शर्ट असून रंग काळा, दाढी वाढलेली आहे

रेल्वेत आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह
परतूर: काचीगुडा- मनमाड या पॅसेंजर रेल्वेमध्ये एका साठ वर्षिय इसमाचा मृतदेह आढळला. त्याच्या अंगावर लालसर शर्ट असून रंग काळा, दाढी वाढलेली आहे. याची ओळख पटली नसून सदर इसम भिकारी असल्याचे रेल्वेचे पोउनि गवई यांनी सांगितले. हा मृतदेह परतूर स्थानकात उतरून घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे.
महिलेचा विनयभंग
निम्न दुधना प्रकल्पात मासेमारी करणाऱ्या एका महिलेचा (वय ३८) तिघा जणांनी विनयभंग केला. ही घटना पाडळी शिवारात घडली. निम्न दुधना प्रकल्पात मासेमारी करणाऱ्या महिलेचा मासे पकडण्याच्या कारणावरून वाद झाला.
पाडळी शिवारात आरोपी चक्रधर पौळ रा. डिग्रस ता. सेलू, रावसाहेब खरात रा. कोरेगाव ता. परतूर, सुंदर हिवाळे रा. साठे नगर परतूर यांनी दि. २ डिसे. रोजी संगनमत करून वाईट उद्देशाने सदर बाईचा हात धरून विनयभंग केला. या प्रकरणी परतूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे जमादार मंडलिक यांनी सांगीतले.
घरकूल मंजूर करून देतो व श्रावण बाळ योजनेची पगार सुरू करून देतो म्हणून पैसे घेवून फसवणूक केल्याप्रकरणी परतूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खांडवी वाडी ता. परतूर येथिल आरोपी अर्जून कचरू आठवे याने पंढरीनाथ ढवळे वय ६५ वर्षे यांची घरकुल मंजूर करून देतो व श्रावण बाळ योजनेची पगार सुरू करून देतो म्हणून पैसे घेवून फसवणूक केली.