दोन दिवसांनंतर सापडला रिक्षाचालकाचा मृतदेह

By | Updated: November 26, 2020 04:13 IST2020-11-26T04:13:36+5:302020-11-26T04:13:36+5:30

दांडगे हे रविवारी मुलीसोबत व्यायामासाठी हर्सूल तलाव परिसरात गेले होते. पोहण्याचा मोह झाल्याने तलावात उतरल्यावर ते बुडाले. ...

The body of the rickshaw puller was found two days later | दोन दिवसांनंतर सापडला रिक्षाचालकाचा मृतदेह

दोन दिवसांनंतर सापडला रिक्षाचालकाचा मृतदेह

दांडगे हे रविवारी मुलीसोबत व्यायामासाठी हर्सूल तलाव परिसरात गेले होते. पोहण्याचा मोह झाल्याने तलावात उतरल्यावर ते बुडाले. घटनेपासून अग्निशामक दल त्यांचा शोध घेत होते. त्यांच्या शोधासाठी धुळ्याच्या राज्य आपत्ती निवारणचे पथक सोमवारी शहरात दाखल झाले होते.

मंगळवारी सायंकाळी ५ वाजता तलावाच्या मध्यभागी पाण्यात त्यांचा मृतदेह आढळून आला. अग्निशामक दलाच्या जवानांनी त्यांना बेशुद्धावस्थेत पाण्यातून बाहेर काढून घाटीत दाखल केले. हर्सूल पोलिसांनी याविषयी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

Web Title: The body of the rickshaw puller was found two days later