लॉजमध्ये आढळला वृद्धाचा मृतदेह

By Admin | Updated: November 14, 2014 00:53 IST2014-11-14T00:36:06+5:302014-11-14T00:53:40+5:30

तुळजापूर : शहरानजीकच्या घटशीळ परिसरातील लॉजमध्ये एका ७३ वर्षीय वृद्धाचा मृतदेह आढळून आला़ ही घटना गुरूवारी दुपारी घडली असून,

The body of the old found in the lodge | लॉजमध्ये आढळला वृद्धाचा मृतदेह

लॉजमध्ये आढळला वृद्धाचा मृतदेह


तुळजापूर : शहरानजीकच्या घटशीळ परिसरातील लॉजमध्ये एका ७३ वर्षीय वृद्धाचा मृतदेह आढळून आला़ ही घटना गुरूवारी दुपारी घडली असून, याप्रकरणी तुळजापूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ दरम्यान, वृध्दासोबत आलेली महिला लॉजमध्ये परत आली नसून तिची माहितीही पोलिसांना मिळाली नाही़ या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे़
पोलिसांनी सांगितले की, शहरातील घाटशीळच्या पायथ्याशी असलेल्या एका लॉजमधील रूम नंबर २०२ मध्ये गुरूवारी सकाळी दादू भगवान सिद्राम (वय-७३ रा़उजनी ता़औसा) व एक महिला उतरले होते़ काही वेळाने दादू यांनी व्यवस्थापकास कोल्ड्रींक्स व पाण्याची बाटली मागवून घेतली़ त्यावेळी वस्तू त्यांना देण्यात आल्या़ दुपारच्या सुमारास दादू सिद्राम यांच्या सोबत आलेली महिला लॉजमधून बाहेर निघून गेली़ ती महिला तास-दीड तासानंतरही परत आली नाही़ त्यामुळे व्यवस्थापकाने रूममध्ये जावून पाहणी केली असता दादू सिद्राम हे बेशुध्द अवस्थेत पडल्याचे दिसून आले़ त्यानंतर व्यवस्थापक पलमारी यांनी सिद्राम यांना तत्काळ उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी आणले़ सिद्राम यांची तपासणी केल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले़ याबाबत लॉज व्यवस्थापक अंबादास काशिनाथ पलमारी यांनी दिलेल्या माहितीवरून तुळजापूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ अधिक तपास पोनि ज्ञानोबा मुंडे हे करीत आहेत़ दरम्यान, सदरील वृध्दासोबत आलेली महिला कोण होती ? खून की आत्महत्या ? का इतर कारणाने सिद्राम यांचा मृत्यू झाला ? याबाबत शहरात चर्चा सुरू असून, शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे कारण समोर येईल, असे पोलिसांनी सांगितले़
नळदुर्ग : खानापूर येथील गांधी यांच्या शेतातील विहिरीत एका २५ वर्षीय युवकाचा मृतदेह बुधवारी रात्री गुराख्यांना दिसून आला होता़ याबाबत गुराखान्यांनी पोलिस पाटील अमोल दयानंद हिप्परगे यांना माहिती दिली़ याबाबत हिप्परगे यांनी नळदुर्ग पोलिसांना कळविले़ नळदुर्ग पोलिसांनी गुरूवारी सकाळी खानापूर येथील विहिरीतील प्रेत बाहेर काढले़ मयत इसमाच्या खिशात दक्षिण हैद्राबाद ते उदगीर असे रेल्वे तिकीट आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले़ पोलिस पाटील अमोल हिप्परगे यांनी दिलेल्या माहितीवरून नळदुर्ग पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली. तपास पोहेकॉ सरपाळे हे करीत आहेत़

Web Title: The body of the old found in the lodge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.