बेपत्ता तरुणाचा मृतदेह आढळला विहिरीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:02 IST2021-05-16T04:02:26+5:302021-05-16T04:02:26+5:30
वैजापूर : येथील साईनाथ कॉलनी भागातून तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदेह शनिवारी (दि. १५) एका विहिरीत सापडला. योगेश ...

बेपत्ता तरुणाचा मृतदेह आढळला विहिरीत
वैजापूर : येथील साईनाथ कॉलनी भागातून तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदेह शनिवारी (दि. १५) एका विहिरीत सापडला. योगेश लक्ष्मण धांडे (२८) असे मृताचे नाव आहे. त्याने आत्महत्या केली की अन्य काही घटना घडली याबाबत पोलिसांकडून काही कळू शकले नाही. याप्रकरणी वैजापूर ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली असून, पोलीस नाईक विजय खोकड पुढील तपास करत आहेत.
गंगापूर रस्त्यावरील साईनाथ कॉलनी भागात राहात असलेले योगेश धांडे हे १२ मेपासून बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या पत्नी मयुरी यांनी दिली होती. योगेश यांचे मावसभाऊ ज्ञानेश्वर दाभाडे हे शनिवारी गंगापूर रस्त्यावरील महालक्ष्मी हॉटेलच्या मागे असलेल्या विहिरीवरील विद्युत पंप सुरु करण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना विहिरीत योगेशचा मृतदेह दिसला. याबाबत तातडीने पोलिसांना कळविल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येत पंचनामा केला. उपजिल्हा रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.