बेपत्ता तरुणाचा मृतदेह गोदावरी पात्रात सापडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:07 IST2021-02-05T04:07:39+5:302021-02-05T04:07:39+5:30

जुने कायगावच्या गोदावरी पात्रात गुरुवारी बेपत्ता तरुणाचा मृतदेह सापडला. शुभम सुभाष कनिसे (२४, रा. तिसगाव, साईनगर, ता. जि. औरंगाबाद) ...

The body of a missing youth was found in a Godavari container | बेपत्ता तरुणाचा मृतदेह गोदावरी पात्रात सापडला

बेपत्ता तरुणाचा मृतदेह गोदावरी पात्रात सापडला

जुने कायगावच्या गोदावरी पात्रात गुरुवारी बेपत्ता तरुणाचा मृतदेह सापडला. शुभम सुभाष कनिसे (२४, रा. तिसगाव, साईनगर, ता. जि. औरंगाबाद) असे तरुणाचे नाव आहे. हा तरुण २६ जानेवारीपासून तिसगाव येथून राहत्या घरातून बेपत्ता झाला होता. याबाबत त्याच्या भावाने वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती.

कायगाव शिवारात गुरुवारी दुपारी घोटेश्वर मंदिराजवळ अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्यातून या तरुणाचा मृतदेह शोधून काढला. २६ जानेवारीपासून त्याची कार नदीच्या पुलाजवळ उभी होती. तेव्हापासून त्याचा या भागात शोध घेतला जात होता. गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. याबाबत गंगापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉं. विजय भिल्ल करत आहेत.

-------

फोटो : शुभम कनिसे या नावाने फोटो सेव्ह आहे.

Web Title: The body of a missing youth was found in a Godavari container