"त्या" बेपत्ता मुलाचा मृतदेह आढळला!
By Admin | Updated: May 22, 2017 19:50 IST2017-05-22T19:50:31+5:302017-05-22T19:50:31+5:30
रिसोड (वाशिम) : हराळ येथे उन्हाळ्याच्या सुटीत बहिणीकडे पाहुणा म्हणून आलेला ओम देवराव खराटे (१६) रा. केनवड, ता. रिसोड या मुलाचा मृतदेह वाडी रायताळच्या सिंचन प्रकल्पात सोमवार, २२ मे रोजी आढळला.

"त्या" बेपत्ता मुलाचा मृतदेह आढळला!
ऑनलाइन लोकमत
रिसोड (वाशिम) : तालुक्यातील हराळ येथे उन्हाळ्याच्या सुटीत बहिणीकडे पाहुणा म्हणून आलेला ओम देवराव खराटे (वय १६ वर्षे, रा. केनवड, ता. रिसोड) या मुलाचा मृतदेह वाडी रायताळच्या सिंचन प्रकल्पात सोमवार, २२ मे रोजी आढळला.
याबाबत अधिक माहिती अशी, की ओम हा २१ मे रोजी वाडी रायताळच्या सिंचन प्रकल्पात पोहायला गेला होता. मात्र, तो उशिरापर्यंत परतला नाही. पोहत असताना तो पाण्यात डुबला असावा, असा अंदाज त्याच्या बहिणीचे पती दीपक सदार यांनी वर्तविला होता. तशा आशयाची तक्रार देखील त्यांनी रिसोड पोलिस ठाण्यात दाखल केली होती. त्यावरून पोलिसांनी घटनास्थळ गाठून ओमचा शोध घेतला. मात्र, २१ मे च्या रात्री उशीरापर्यंत त्याचा थांगपत्ता लागला नाही. सकाळी पुन्हा शोध घेतला असता, प्रकल्पातील पाण्यात ओमचा मृतदेह आढळून आला. यावेळी घटनास्थळी गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. ओमच्या मृत्यूमुळे वाडी येथे हळहळ व्यक्त केली जात आहे.