अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळला
By Admin | Updated: August 10, 2014 23:51 IST2014-08-10T23:46:52+5:302014-08-10T23:51:52+5:30
अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळला

अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळला
पूर्णा : येथील रेल्वेपुलाखाली एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह १० आॅगस्ट रोजी सकाळी आढळला. या प्रकरणी पूर्णा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार पूर्णा येथील धुराजी लिंबाजी गवळी हे रेल्वेपुलाखाली सरपण वेचण्यासाठी गेले असता त्यांना हा मृतदेह आढळला. त्यांनी पूर्णा पोलिसांना ही माहिती दिली. मयत मुलगी ही रंगाने काळी असून तिच्या अंगावर जांभळा शर्ट व पांढऱ्या रंगाचा सलवार आहे. पुलावरुन खाली पडून ती मरण पावली असावी, असा अंदाज आहे. पूर्णा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक शेख या प्रकरणाचा तपास करीत आहेत.(प्रतिनिधी)