शेतकऱ्याचा मृतदेह रात्रभर ठाण्यात

By Admin | Updated: June 30, 2014 00:36 IST2014-06-30T00:24:05+5:302014-06-30T00:36:43+5:30

माजलगाव: तालुक्यातील जदीद जवळा येथे एका शेतकऱ्याने जमिनीच्या वादातून आत्महत्या के ली होती़

The body of the farmer stole overnight | शेतकऱ्याचा मृतदेह रात्रभर ठाण्यात

शेतकऱ्याचा मृतदेह रात्रभर ठाण्यात

माजलगाव: तालुक्यातील जदीद जवळा येथे एका शेतकऱ्याने जमिनीच्या वादातून आत्महत्या के ली होती़ ग्रामीण ठाण्याचे निरीक्षक ओ़ डी़ माने यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यात सहआरोपी करण्याच्या मागणीसाठी नातेवाईक रात्रभर ठाण्यात ठेवला़
जदीद जवळा येथील शेतकरी बाबासाहेब भानुदास बापमारे यांचा त्यांच्याच नातेवाईकांसोबत गट क्ऱ ६२ मधील जमिनीचा वाद न्यायालयात सुरु होता़ दहा ते बारा जणांनी चार दिवसांपूर्वी त्यांच्या राहत्या घराची नासधूस केली होती़ फिर्याद देण्यास त्यांची पत्नी मीरा व मुलगा गेले तेंव्हा निरीक्षक ओ़ डी़ माने यांनी त्यांनाच धमकावत दोन दिवस जेलमध्ये ठेवले, असा नातेवाईकांचा आरोप आहे़ यादरम्यान बाबासाहेब बापमारे हे पंढरपूरला दिंडीत गेले होते़ पत्नी, मुलाला पोलीसांनी डांबल्याचे कळाल्यावर ते गावी आले़ निराश होऊन त्यांनी शुक्रवारी रात्री आत्महत्या केली़ शनिवारी त्यांचे प्रेत दिवसभर झाडालाच लटकलेले होते़ पोलीस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डींपुढे कुटुंबियांनी धायमोकलून रडत दाद मागितली. त्यानंतर तपासाची चक्रे गतिमान झाली़ त्यानंतर शहर पोलिसांकडे सूत्रे सोपविली़ या प्रकरणी तेरा जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हाही नोंद झाला़
दरम्यान, शवविच्छेदन झाल्यावर रात्री नऊ वाजता नातेवाईकांनी बाबासाहेब बापमारे यांचा मृतदेह थेट ग्रामीण ठाण्यात आला़ निरीक्षक ओ. डी़ माने यांना सहआरोपी करा, अशी मागणी नातेवाईकांनी लावून धरली़
अधीक्षकांनी दिले आश्वासन
पोलीस उपअधीक्षक दिनकर शिंदे यांनी नातेवाईकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी पोलीस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांनाही याबाबत कळविले. रेड्डी यांनी नातेवाईकांची समजूत काढून या प्रकरणाची योग्य ती चौकशी केली जाईल, असे आश्वासन दिले़ त्यानंतर पहाटे तीन वाजता नातेवाईकांनी बाबासाहेब बापमारे यांचे प्रेत ठाण्यातून हलविले व अंत्यविधी पार पडला़ यावेळी पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. (वार्ताहर)
नातेवाईकांचा आक्रोश
शवविच्छेदनानंतर बाबासाहेब बापमारे यांचा मृतदेह घेऊन नातेवाईक ग्रामीण ठाण्यात पोहचले यावेळी निरीक्षक मानेंवर कारवाई होत नाही तोपर्यंत प्रेत उचलणार नाही, असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला
नातेवाईकांच्या आक्रोश आणि हुंदक्यांनी ठाण्याचा परिसर सुन्न झाला होता

Web Title: The body of the farmer stole overnight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.