पाण्यात बुडालेल्या युवकाचा मृतदेह आढळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:05 IST2021-09-24T04:05:27+5:302021-09-24T04:05:27+5:30

दरम्यान, बुधवारी सायंकाळी मनोज व त्याचा मित्र पोहण्यासाठी सिमेंट बंधाऱ्यावर गेले. त्यांनी उडी मारताच मनोज पुन्हा वर आलाच नाही. ...

The body of a drowned youth was found | पाण्यात बुडालेल्या युवकाचा मृतदेह आढळला

पाण्यात बुडालेल्या युवकाचा मृतदेह आढळला

दरम्यान, बुधवारी सायंकाळी मनोज व त्याचा मित्र पोहण्यासाठी सिमेंट बंधाऱ्यावर गेले. त्यांनी उडी मारताच मनोज पुन्हा वर आलाच नाही. ही घटना गावकऱ्यांना कळाली. रात्रीपर्यंत पाचोड पोलिसांसह स्थानिकांच्या मदतीने मनोजचा सिमेंट बंधाऱ्यात शोध घेण्यात आला, परंतु तो मिळून आला नव्हता.

गुरुवारी सकाळी पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात आले. अखेर सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास मनोजचा मृतदेह आढळून आला. पाचोड ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले, तर दुपारी २ वाजता गावातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. सदरील शोधकार्यासाठी पाचोड पोलीस ठाण्याचे स.पो.नि. गणेश सुरवसे, महसूलचे मंडळ अधिकारी बाळासाहेब खेडकर, फौजदार सुरेश माळी, सरपंच ॲड. किशोर वैद्य व ग्रामस्थ अनिल काळे, सोमनाथ रोडगे, लक्ष्मण काळे, ज्ञानेश्वर काळे यांनी परिश्रम घेतले.

230921\1858-img-20210923-wa0020.jpg

छाया : नांदर ता पैठण येथील विरभद्रा नदीतील याच बंधार्यातुन मृत मनोज काळेचा मृतदेह काढण्यात आला.( छाया : अंबादास एडके )

Web Title: The body of a drowned youth was found