डाव्या कालव्यात मृतदेह आढळला
By Admin | Updated: December 4, 2014 00:52 IST2014-12-04T00:31:06+5:302014-12-04T00:52:26+5:30
वडीगोद्री : येथून जवळ असलेल्या चुर्मापुरी येथील पैठण डाव्या कालव्यात एका २५ ते ३० वर्ष वयाच्या इसमाचा मृतदेह आढळून आला.

डाव्या कालव्यात मृतदेह आढळला
वडीगोद्री : येथून जवळ असलेल्या चुर्मापुरी येथील पैठण डाव्या कालव्यात एका २५ ते ३० वर्ष वयाच्या इसमाचा मृतदेह आढळून आला. ३ डिसेंबर रोजी शेख अक्तर शेख इमाम यांनी हा मृतदेह पाहून पोलिसांना खबर दिली.
गोंदी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सोमनाथ शिंदे यांनी घटनेचा पंचनामा करून प्रेताची विल्हेवाट लावली. मयताच्या डाव्या अंगठ्यावर डी.आर. असे गोंदलेले आहे. उजव्या हातात काळा दोरा बांधलेला होता. कालव्यात पाणी संथ झाल्यानंतर हा मृतदेह आढळून आल्याचे शिंदे यांनी सांगितले.
जालना शहरातील महसूल कॉलनी भागात असलेल्या विठ्ठल-रूख्मिणी मंदिराची दानपेटी फोडून चोरट्यांनी दोन ते तीन हजार रुपये पळवून नेले. हा प्रकार ३ डिसेंबरच्या रात्री घडल्याचे लक्ष्मीकांत कुलकर्णी यांनी तालुका जालना पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.