गोकर्ण माळापाशी आढळला मृतदेह
By Admin | Updated: September 6, 2014 00:27 IST2014-09-05T23:53:41+5:302014-09-06T00:27:00+5:30
औंढा नागनाथ : गोकर्ण माळाच्या पायथ्याशी ६५ वर्षीय इसमाने जंगलामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दुपारी १२ वाजता उघडकीस आली आहे.

गोकर्ण माळापाशी आढळला मृतदेह
औंढा नागनाथ : गोकर्ण माळाच्या पायथ्याशी ६५ वर्षीय इसमाने जंगलामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दुपारी १२ वाजता उघडकीस आली आहे. सदर इसम हा जिंतूर तालुक्यातील असल्याने ही घटना संशयास्पद वाटत असून, याबाबत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
औंढा नागनाथ येथील वन पर्यटनातील चौकीदार गोकर्ण माळावर जात असताना जंगलामध्ये व्यक्तीचा देह झाडाला लटकलेल्या अवस्थेमध्ये आढळून आला. त्यांनी याची माहिती पश्चिम वनपरिक्षेत्र अधिकारी डी. एस. खुपसे यांना कळविली. त्यांनी ही माहिती औंढा पोलिसांना दिल्याने पोनि लक्ष्मण केंद्रे, जमादार नूरखाँ पठाण, वनरक्षक दोडके, भोसले यांना सोबत घेऊन घटनास्थळाचा पंचनामा केला असता त्याने पळसाच्या झाडाला डोक्यावरील फेट्याने गळफास घेतल्याचे उघडकीस आले. त्यांच्या खिशामध्ये निवडणूक आयोगाच्या ओळखपत्राद्वारे त्याची ओळख पटली. त्यांचे नाव गणपत गोमाजी कऱ्हाळे (रा. पिंपळगाव काजळे, ता.जिंतूर जि. परभणी) येथील असल्याचे निष्पन्न झाले. परंतु जिंतूरच्या व्यक्तीने औंढ्यात येऊन गळफास घेणे हे पोलिसांना संशयास्पद वाटत आहे. याबाबत औंढा पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (वार्ताहर)