घरासमोरील कारमध्ये आढळला मृतदेह
By Admin | Updated: July 3, 2017 23:47 IST2017-07-03T23:46:33+5:302017-07-03T23:47:07+5:30
परळी : घरासमोर उभा असलेल्या कारमध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे

घरासमोरील कारमध्ये आढळला मृतदेह
लोकमत न्यूज नेटवर्क
परळी : घरासमोर उभा असलेल्या कारमध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना परळी शहरातील कंडक्टर कॉलनीत सोमवारी सकाळी उघडकीस आली.
दीपक शिवाजी आंधळे (३०) असे युवकाचे नाव आहे. दीपक आंधळे हे गुत्तेदार आहेत. रविवारी आंधळे व त्यांचा मित्र सुपरवायझर प्रेम गायकवाड व त्याचा आत्याभाऊ मुंडे (दोघेही रा.परळी) हे तिघे कारमधून (एमएच १७ - ६०४३) लातूर येथे सासरवाडीला गेले होते. दिवसभर तेथे थांबल्यानंतर ते रात्री परत आले. आंधळे यांना घरी सोडल्यानंतर ते दोघे निघून गेले. सकाळी दीपक आंधळे यांच्या आईला हा सर्व प्रकार निदर्शनास आला. त्यांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलीस निरीक्षक उमेश कस्तूरे, फौजदार लक्ष्मण भिल्लारे, रमेश सिरसाट, गित्ते यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. परळी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान दीपक आंधळे यांचा दीड वर्षांपूर्वीच विवाह झालेला आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी व चार महिन्याची मुलगी असा परिवार आहे.