बोर्डाचा लिपिक पकडला रंगेहाथ

By Admin | Updated: July 5, 2014 01:03 IST2014-07-05T00:56:56+5:302014-07-05T01:03:05+5:30

औरंगाबाद : बस भाड्यासाठी पैसे नाहीत म्हणून सिडको बसस्थानकाहून बोर्डापर्यंत पायी गेलेल्या गरीब विद्यार्थ्याची आर्थिक पिळवणूक करणे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण

Board clerk caught | बोर्डाचा लिपिक पकडला रंगेहाथ

बोर्डाचा लिपिक पकडला रंगेहाथ

औरंगाबाद : बस भाड्यासाठी पैसे नाहीत म्हणून सिडको बसस्थानकाहून बोर्डापर्यंत पायी गेलेल्या गरीब विद्यार्थ्याची आर्थिक पिळवणूक करणे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडाळातील (बोर्ड) लिपिकाला चांगलेच महागात पडले. दहावीच्या मार्कमेमोमध्ये नावात झालेली चूक दुरुस्त करण्यासाठी या गरीब विद्यार्थ्याकडून पाचशे रुपये घेताना बोर्डातील या लिपिकाला शुक्रवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी रंगेहाथ अटक केली.
शेषराव शामराव पडोळ (५१, रा. अष्टविनायकनगर, सातारा परिसर), असे त्या लिपिकाचे नाव आहे. बदनापूर तालुक्यातील कंडारी येथील किरण भगवान ढाकणे हा विद्यार्थी नुकताच दहावी उत्तीर्ण झाला. त्याच्या मार्कमेमोमध्ये ‘किरण भगवान ढाकणे’ऐवजी ‘किरण भगवानराव ढाकणे,’ असे छापून आले होते. वडिलांच्या नावापुढे ‘राव’ लागल्याने प्रवेशासाठी अडचण येऊ शकते, हे लक्षात आल्यानंतर नावातील ही दुरुस्ती करून घेण्यासाठी किरण हा त्याचा मामा संदीप सानप (रा. चणेगाव, बदनापूर) यांच्यासह गुरुवारी औरंगाबादेत आला. या मामा-भाच्याची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. सिडको बसस्थानकावर ते उतरले. त्यांच्याकडे पुरेसे पैसे नव्हते. त्यामुळे बस किंवा रिक्षाने जाण्याऐवजी हे मामा-भाचे बसस्थानकापासून बोर्ड कार्यालयापर्यंत पायी गेले. मार्कमेमोतील दुरुस्तीचे काम तेथील कनिष्ठ लिपिक शेषराव पडोळकडे होते. या दोघांनी पडोळची भेट घेतली. तेव्हा त्याने हे काम सोपे नाही. ते फुकटात होत नसते, असे म्हणत दुरुस्ती करून देण्यासाठी पाचशे रुपयांची मागणी केली. उद्या पैसे घेऊन या आणि मार्कमेमोत दुरुस्ती करून देतो, असे पडोळ म्हणाला. दोघांनी आपली आर्थिक अडचण सांगितली; पैसे आणले तरच मार्कमेमो दुरुस्त करून देतो, असे तो म्हणाला.
अशा स्थितीत आर्थिक पिळवणूक करणाऱ्या या पडोळला धडा शिकविण्याचा मामा-भाच्याने निर्र्णय घेतला आणि बोर्ड कार्यालयातून थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गाठला. तेथे पडोळविरुद्ध तक्रार दिली.

Web Title: Board clerk caught

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.