हंगेवाडीत इसमाचा खून ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 00:31 IST2017-08-28T00:31:36+5:302017-08-28T00:31:36+5:30

नांदूरघाट येथे एका ५० वर्षीय इसमाचा मृतदेह बाभळीच्या झाडावर बसून गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. पोलिसांनी जरी अकस्मात मृत्यूची नोंद केली असली तरी परिस्थिती पाहता हा खून असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे

 Bloody blood in Hangawadi? | हंगेवाडीत इसमाचा खून ?

हंगेवाडीत इसमाचा खून ?

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड/नांदूरघाट : केज तालुक्यातील नांदूरघाट येथे एका ५० वर्षीय इसमाचा मृतदेह बाभळीच्या झाडावर बसून गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. पोलिसांनी जरी अकस्मात मृत्यूची नोंद केली असली तरी परिस्थिती पाहता हा खून असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मयताच्या सासरची व घरची मंडळी समोरासमोर आल्याने काही वेळ तणाव निर्माण झाला होता.
बबरु लक्ष्मण काळे (रा.गोलेगाव ता.परंडा जि.भूम) असे मयत इसमाचे नाव आहे. सदर इसम हा पारधी समाजाचा असल्याचे बोलले जात आहे. घटनेची माहिती समजताच गोलेगाव येथील १०० ते १५० महिला व पुरुष घटनास्थळी आल्याने तणाव वाढला होता.
केजचे पो. नि. शिरीष हुंबे, फौजदार सुरेश माळी यांनी धाव घेत दिवसभर गावात तळ ठोकला. उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार नाईक यांनीही भेट दिली. नातेवाईकांना आश्वासन दिल्यावर मृतदेह खाली घेण्यात आला. परिस्थिती चिघळण्याची परिस्थिती पाहता आणखी पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी मागविले होते. मयताचे नातेवाईक समोरासमोर आल्याने बंदोबस्त मागविला होता. ही आत्महत्या आहे. शवविच्छेदनानंतर परिस्थिती समोर येईल. तपास सुरू असल्याचे माळी यांनी सांगितले.

Web Title:  Bloody blood in Hangawadi?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.