गायरान जमिनीच्या वादातून महिलेचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 00:36 IST2017-08-08T00:36:28+5:302017-08-08T00:36:28+5:30

गायरान जमिनीच्या वादातून पारधी समाजाच्या महिलेचा धारदार शस्त्राने वार करून खून झाल्याची घटना येथून जवळच असलेल्या रांजणगाव शिवारात घडली.

The blood of the woman from Garyan land dispute | गायरान जमिनीच्या वादातून महिलेचा खून

गायरान जमिनीच्या वादातून महिलेचा खून

लोकमत न्यूज नेटवर्क
बिडकीन : गायरान जमिनीच्या वादातून पारधी समाजाच्या महिलेचा धारदार शस्त्राने वार करून खून झाल्याची घटना येथून जवळच असलेल्या रांजणगाव शिवारात घडली. झालाबाई सोपान काळे (५०, रा. बाजारतळ बिडकीन) असे मृत महिलेचे नाव आहे.
झालाबाई शनिवारी सकाळी गट नं. १२६ मधील गायरान जमिनीवरील शेतात गेल्या होत्या. त्या घरी परत न आल्यामुळे नातेवाईकांनी शोध घेतला, पण त्या सापडल्या नाही. रविवारी सायंकाळी रांजणगाव येथील पोलीस पाटलांना रांजणगाव
शिवारात मोसंबीच्या शेतात एका महिलेचा मृतदेह असल्याचे समजले. त्यांनी पोलिसांना ही माहिती कळविली.
बिडकीनचे सपोनि. पंडीत सोनवणे, सहायक फौजदार आईटवार, बलभीम राऊत, जमादार प्रकाश शिंदे, बाळासाहेब लोणे, दिलीप चौरे, पोलीस कर्मचारी दीपक देशमुख, सुग्रीव घुगे, सुनील सुरासे, तोडकर यांनी घटनास्थळ गाठून सदर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केला. सदर मृतदेह झालाबाईचाच असल्याची खात्री झाल्याने विलास सोपान काळे यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. खून झाल्यानंतर फाशी देऊन झालाबाईला मारल्याचे निष्पन्न झाले.

Web Title: The blood of the woman from Garyan land dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.