पैंजेसाठी केला खून

By Admin | Updated: July 15, 2017 17:54 IST2017-07-15T17:51:50+5:302017-07-15T17:54:13+5:30

गुन्हेशाखेने २४ तासाच्या आत पालोद येथे झालेल्या खुनाचा उलगड़ा केला असून अविनाश जाधव या आरोपीस मुक्ताई नगर येथून जेरबंद केले आहे.

Blood for pennage | पैंजेसाठी केला खून

पैंजेसाठी केला खून

ऑनलाईन लोकमत

 
औरंगाबाद/सिल्लोड: गुन्हेशाखेने  २४ तासाच्या आत पालोद येथे झालेल्या खुनाचा उलगड़ा केला असून अविनाश जाधव या आरोपीस मुक्ताई नगर येथून जेरबंद केले आहे. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून मित्रासोबत लावलेल्या पैंजेतून खून केल्याची कबुली दिली आहे. 
 
या बाबत अधिक माहिती अशी कि, सिल्लोड तालुक्यातील पालोद जवळ गुरुवारी मध्यरात्री क्रुझर गाडीच्या चालकाचा गाडीतील प्रवास्यानीच खून केला होता. आरोपीने चालक शेख शकील शेख शब्बीरवर धारदार शस्त्राचे वर करून त्यास जळगाव रोडवर पालोद जवळ फेकले होते व गाडी घेऊन पळवली होती. या प्रकरणाचा उलगडा सिलोड गुन्हेशाखेने  २४ तासाच्या आत करत आरोपी अविनाश संतोष जाधव (१९ वर्ष, रा. हिंगने ता. जामनेर. जि. जळगाव ) यास  मुक्ताई नगर येथून जेरबंद केले. 
 
जिप घेण्यासाठी मित्रांशी पैज लावली होती.परंतु; जीप घेण्याची ऐपत नसल्याने ती पैज पूर्ण करण्यासाठी क्रुझरच्या चालकाचा खून करून गाडी पळवल्याची कबुली अविनाशाने पोलिसांना दिली. 

 

Web Title: Blood for pennage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.