वाळूज उद्योगनगरीत रक्तदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:31 IST2020-12-17T04:31:58+5:302020-12-17T04:31:58+5:30
सध्या शहरात रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत असल्यामुळे मसिआ संघटना व औद्योगिक क्षेत्रातील मे. चंद्रा इलेक्ट्रिकल अॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स व ...

वाळूज उद्योगनगरीत रक्तदान शिबिर
सध्या शहरात रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत असल्यामुळे मसिआ संघटना व औद्योगिक क्षेत्रातील मे. चंद्रा इलेक्ट्रिकल अॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स व धनंजय ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन मसिआचे अध्यक्ष अभय हंचनाळ यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरात मसिआ संघटनेचे पदाधिकारी, उद्योजक व कंपनीतील अधिकारी व कर्मचारी अशा एकूण ८३ जणांनी स्वयंस्फूर्तपणे रक्तदान केले. यावेळी रक्त संकलनाचे कार्य दत्ताजी भाले रक्तपेढीच्या डॉ. श्रद्धा परळीकर, अप्पासाहेब सोमासे, चरणसिंग चव्हाण, रेखा दिवटे, प्रियंका चव्हाण, संतोष मासाळ, विजय पैठणकर, सुनीता हिरे आदींनी केले. याप्रसंगी मसिआचे उपाध्यक्ष नारायण पवार, सचिव भगवान राऊत, राहुल मोगले, अब्दुल शेख, राजेश मानधनी, अनिल पाटील, गजानन देशमुख, अर्जुन गायकवाड, सर्जेराव साळुंके, सचिन गायके, सुमित मालानी आदीसह मसिआच्या पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
फोटो ओळ- वाळूजच्या मसिआ सभागृहात आयोजित रक्तदान शिबिरात रक्तदानाचा हक्क बजावतांना उद्योजक व कंपनीतील अधिकारी-कर्मचारी दिसत आहेत.
फोटो क्रमांक-रक्तदान
-------------------------