शिवा ट्रस्टतर्फे रक्तदानाने शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:28 IST2020-12-17T04:28:05+5:302020-12-17T04:28:05+5:30

औरंगाबाद : माजी कृषिमंत्री शरदचंद्र पवार यांचा वाढदिवस शिवा ट्रस्टच्या वतीने रक्तदान शिबिर घेऊन साजरा करण्यात आला. शिवा ...

Blood donation camp by Shiva Trust | शिवा ट्रस्टतर्फे रक्तदानाने शिबिर

शिवा ट्रस्टतर्फे रक्तदानाने शिबिर

औरंगाबाद : माजी कृषिमंत्री शरदचंद्र पवार यांचा वाढदिवस शिवा ट्रस्टच्या वतीने रक्तदान शिबिर घेऊन साजरा करण्यात आला. शिवा ट्रस्ट संचालित यशवंतराव चव्हाण आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय, निपाणी-भालगावच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिबिरात ७५ दात्यांनी रक्तदान केले.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते आनंद भालेकर, शिवा ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. बाळासाहेब पवार यांच्या हस्ते फीत कापून शिबिराचे उद्‌‌घाटन करण्यात आले. प्रा. विखे पाटील, उल्हास पाटील, मनोज बोरा, शंकर अडसूळ आदींची प्रमुख उपस्थिती होती. महामारीतही शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. उपप्राचार्य डाॅ. पंकज गहुंगे, प्राचार्य राजेंद्र कवडे, डॉ. संदीप कांबळे, डॉ. आशाश्री शिंदे, गौरव कांडाळकर, अनिल झाल्टे, विकास हमने, सुनील गरंडवाल, रमेश राठोड, दिनेश पाथ्रीकर, दीपक भोजणे, शिवाजी वाघमोडे, विशाल चव्हाण, डॉ. सौम्या मिश्रीकोटकर, आबासाहेब पाथ्रीकर, प्रभू भोजणे, राजेश कदम आदींनी शिबिर यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. एमजीएम रक्तपेढीने रक्तसंकलन केले.

Web Title: Blood donation camp by Shiva Trust