वाळूजच्या मसिआ सभागृहात ८६ जणांचे रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:04 IST2021-05-07T04:04:21+5:302021-05-07T04:04:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वाळूज महानगर : वाळूजच्या मसिआ सभागृहात आज (गुरुवारी) जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या उपस्थितीत आयोजित रक्तदान शिबिरात ...

वाळूजच्या मसिआ सभागृहात ८६ जणांचे रक्तदान
लोकमत न्यूज नेटवर्क
वाळूज महानगर : वाळूजच्या मसिआ सभागृहात आज (गुरुवारी) जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या उपस्थितीत आयोजित रक्तदान शिबिरात ८६ जणांनी रक्तदानाचा हक्क बजावला.
राईझिंग इंटरप्रेनर ग्रुप व दत्ताजी भाले रक्तपेढीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या रक्तदान शिबिराचे उद्घाटन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे, माणिक आहेत, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी राजेश जोशी, मसिआचे अध्यक्ष अभय हंचनाळ, सचिव राहुल मोगले, सीएमआयएचे उपाध्यक्ष शिवप्रसाद जाजू, रमण आजगावकर, आदी उपस्थित होते. या शिबिरात जिल्हाधिकाऱ्यांनी रक्तदानाचा हक्क बजावत कोरोना काळात रक्ताचा तुटवडा असल्याने रक्तदानासाठी प्रत्येकाने पुढे येण्याचे आवाहन केले.
यावेेळी रायझिंग इंटरप्रेनरच्या राजवी वेलंगी, रितीका गोयल, आदिती लामतुरे आदींसह मसिआचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी रक्त संकलनाचे कार्य दत्ताजी भाले रक्तपेढीकडून करण्यात आले.
फोटो ओळ - वाळूजच्या मसिआ सभागृहात आयोजित रक्तदान शिबिरात रक्तदानाचा हक्क बजावताना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण व इतर.
----------------------