बसवेश्वर जयंतीनिमित्त ५३ दात्यांनी केले रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:02 IST2021-05-15T04:02:12+5:302021-05-15T04:02:12+5:30
आकाशवाणीजवळील महात्मा बसवेश्वर चौकात प्रारंभी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेला ...

बसवेश्वर जयंतीनिमित्त ५३ दात्यांनी केले रक्तदान
आकाशवाणीजवळील महात्मा बसवेश्वर चौकात प्रारंभी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर रक्तदान शिबिराला सुरुवात झाली. यात ५३ दात्यांनी रक्तदान केले. यावेळी आ. अतुल सावे, माजी महापौर नंदकुमार घोडेले, राजू वैद्य, शिवसेना शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी, माजी नगरसेवक सचिन खैरे, ऋषिकेश खैरे, वीरभद्र गादगे, मकरंद कुलकर्णी, कैलास गायकवाड,
शिल्पाराणी वाडकर, शोभा बुरांडे, लिंगायत संघर्ष समितीचे मराठवाडा अध्यक्ष ज्ञानेश्वर आप्पा खर्डे, जिल्हाध्यक्ष शिवा खांडखुळे, महात्मा बसवेश्वर जयंती महोत्सव समिती अध्यक्ष आशिष लकडे, प्रदीप बुरांडे, विरेंद्र मंगलगे, सचिन संगशेट्टी, दीपक उरगुंडे, डॉ. बेंजरगे, डॉ. सचिन नागरे, डॉ. शालिग्राम तोंडे आदींची यावेळी उपस्थिती होती. तसेच शहरातील नामवंत उद्योगपती सांगळे साहेब या सर्वांची प्रमुख उपस्थिती होती. शेखर कोठुळे, अमोल हुंडीवाले, प्रतीक मेने, नंदू गवंडर, शिवानंद मोधे, परशुराम मोधे, अमोल मिटकरी, नितीन माटे, संतोष कोठाळे, संजय माटे, दुर्गेश होनराव, मनोज गवंडर, सुनील भगुरे, प्रमोद गुळवे, विकास मोधे, सारंग लकडे, रवींद्र घोडकी आदींनी रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.