गारज येथील शिबिरात ३८ जणांचे रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:07 IST2021-07-14T04:07:22+5:302021-07-14T04:07:22+5:30
बाजीराव स्वामी मंदिरात सकाळी ९ वाजता शिबिराचे उद्घाटन सरपंच पुष्पा सरोवर, उपसरपंच दशरथ सरोवर, राष्ट्रवादीचे सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष ...

गारज येथील शिबिरात ३८ जणांचे रक्तदान
बाजीराव स्वामी मंदिरात सकाळी ९ वाजता शिबिराचे उद्घाटन सरपंच पुष्पा सरोवर, उपसरपंच दशरथ सरोवर, राष्ट्रवादीचे सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष दिगंबर मोरे यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी सरपंच कारभारी सरोवर, सुभाष सरोवर, विलास सरोवर, माजी उपसरपंच तातेराव चव्हाण, ग्रामविकास अधिकारी पी. व्ही. मोगल, ग्रामसेवक कटारे, नारायण तुपे, विभाग प्रमुख प्रभाकर जाधव, नूर शेख, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष किरण सरोवर, योगेश सूर्यवंशी आदींची प्रमुख उपस्थिती होती. शिबिर यशस्वीतेसाठी संजय कुलकर्णी, अनिल सरोवर, गणेश घोडके, सचिन निपाणे, माजी उपसरपंच सुरेश सरोवर, गणेश तुपे, प्रदीप कोतकर, वैशाली मांडवगड दीपक तुपे आदींनी सहकार्य केले. रक्तसंकलन औरंगाबाद रक्तपेढीकडून करण्यात आले. यावेळी मिली फाऊंडेशनच्यावतीने मास्क व केळी वाटप करण्यात आले.
रक्तदात्यांची नावे
ग्रामपंचायत सदस्य दिगंबर मोरे, माजी उपसरपंच तातेराव चव्हाण, उत्तम सरोवर, योगेश कांदे, राजेश इंगळे, सपोनि. प्रमोद सरोवर, सूरज सातदिवे, काकासाहेब अधुडे, कुमार कुलकर्णी, मंगेश चव्हाण, साहिल शेख, सचिन निपाणे, अनिल सरोवर, प्रेमकुमार वाघ, उमेश गायकवाड, शंकर लंबे, साहेबराव दरेकर, महेश शेळके, आनंद भवर, विनोद गायकवाड, सुलोचना डगळे, प्रशांत सरोवर, भीमराज मोरे, दादासाहेब ठुबे, विशाल सरोवर, विठ्ठल सरोवर, प्रतीक तांबे, गोकुळ दवंगे, सुनिल चंदिले, योगेश निकम, अंकुश सरोवर, संतोष सरोवर, रामेश्वर सरोवर, प्रदीप सरोवर, करण पाचुंदे, शिवनाथ लंबे, दादासाहेब सरोवर, प्रवीण निपाणे यांनी रक्तदान केले.