संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त ११३ दात्यांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:04 IST2021-05-15T04:04:02+5:302021-05-15T04:04:02+5:30

कोरोनामुळे मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. यामुळे एक सामाजिक जबाबदारी म्हणून सह्याद्री प्रतिष्ठान कन्नड, जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळ, ...

Blood donation of 113 donors on the occasion of Sambhaji Maharaj's birthday | संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त ११३ दात्यांचे रक्तदान

संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त ११३ दात्यांचे रक्तदान

कोरोनामुळे मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. यामुळे एक सामाजिक जबाबदारी म्हणून सह्याद्री प्रतिष्ठान कन्नड, जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळ, साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ, शिक्षक भारती, शिक्षक सेना यांनी सर्व शासकीय नियमांचे पालन करीत या रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन कन्नड शहराचे पोलीस निरीक्षक रामेश्वर रेंगे, डॉक्टर मिलिंद पाटील यांच्या हस्ते झाले. रक्तदात्यांना आयोजकांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा व सॅनिटायझरचे वाटप केले. यावेळी अर्जून वाकळे यांनी मुलाच्या वाढदिवसानिमित्त सह्याद्री प्रतिष्ठाणला १० हजार रुपयांचा निधी दिला. तसेच नवविवाहित जोडपे प्रमोद आहेर व मयुरी आहेर यांनी रक्तदान करून सह्याद्री प्रतिष्ठानला गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी पाच हजार रुपयांचा धनादेश दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सह्याद्री प्रतिष्ठान कन्नडचे तालुकाध्यक्ष शिवराज पाटील व आभार प्रदर्शन साने गुरुजी विद्यालयाचे मुख्याध्यापक धैर्यशील केरे यांनी केले.

Web Title: Blood donation of 113 donors on the occasion of Sambhaji Maharaj's birthday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.