इंधन दरवाढीविरोधात सिल्लोडमध्ये राष्ट्रवादीचा रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:05 IST2021-02-12T04:05:17+5:302021-02-12T04:05:17+5:30
ठगन भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली हा रास्ता रोको करण्यात आला. प्रशासनाला दिलेल्या निवेदनात दैनंदिन वापरातील वस्तूंवर जी दरवाढ झालेली ...

इंधन दरवाढीविरोधात सिल्लोडमध्ये राष्ट्रवादीचा रास्ता रोको
ठगन भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली हा रास्ता रोको करण्यात आला. प्रशासनाला दिलेल्या निवेदनात दैनंदिन वापरातील वस्तूंवर जी दरवाढ झालेली आहे, ती केंद्र सरकारने त्वरित कमी करावी. अन्यथा तीव्र स्वरुपात आंदोलन छेडले जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला. याप्रसंगी राष्ट्रवादी दिव्यांग सेलचे प्रदेश सरचिटणीस शेख मोहम्मद नसिर, रायुकॉ. तालुकाध्यक्ष अनिल राऊत, शहराध्यक्ष शेख अमान, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष अंकुश पाटील, आकाश दौड, पांडुरंग बडक, सीताराम कुमावत, योगेश फरकाडे, प्रवीण काकडे, दादाराव काळे, प्रवीण सुळ, दत्ता मोरे, संजय सुळ, योगेश ताजणे, पवन चिंचपूरे, सय्यद नदीम, सचिन सोनवणे, युसूफ शेख, जाफर शहा, बालाजी शिंदे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटो कॅप्शन
: राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सिल्लोडमध्ये रास्ता रोको आंदोलन करुन प्रशासनाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले.