सिल्लोडात महावितरण विरोधात भाजपचा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:30 IST2020-12-17T04:30:25+5:302020-12-17T04:30:25+5:30

आंदोलनात मोठ्या संख्येने भाजप पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर मोठे यांनी शेतकऱ्यांची पिळवणूक त्वरित न थांबविल्यास महावितरणच्या ...

Block BJP's path against MSEDCL in Silloda | सिल्लोडात महावितरण विरोधात भाजपचा रास्ता रोको

सिल्लोडात महावितरण विरोधात भाजपचा रास्ता रोको

आंदोलनात मोठ्या संख्येने भाजप पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर मोठे यांनी शेतकऱ्यांची पिळवणूक त्वरित न थांबविल्यास महावितरणच्या अधिकाऱ्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा दिला. महावितरणचे कार्यकारी अभियंता चिकणीस यांनी मागण्यांचे निवेदन स्वीकारले. येत्या आठ दिवसांत सर्वच जळालेल्या डीपी बदलून देण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. आंदोलनात माजी आमदार सांडू पाटील लोखंडे, भाजपा प्रदेश चिटणीस इद्रीस मुलतानी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुरेश बनकर, तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर मोठे, उपजिल्हाध्यक्ष दिलीप दाणेकर, शहराध्यक्ष कमलेश कटारीया, विलास पाटील, सांडू पाटील दौड, सुभाष मानकर,नगरसेवक मनोज मोरेल्लू, किरण पवार, किशोर गवळे, अनिल खरात, साहेबराव बांबर्डे, विजय वानखेडे, शहराध्यक्ष अरुण राठोड, विष्णू काटकर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

फोटो कॅप्शन : सिल्लोड शहरातील भराडी रोडवर भाजपतर्फे दोन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ते.

Web Title: Block BJP's path against MSEDCL in Silloda