ब्लँकेट, सतरंज्या पंचायत समितीत धूळखात पडून
By Admin | Updated: November 20, 2014 00:46 IST2014-11-20T00:34:23+5:302014-11-20T00:46:52+5:30
गजानन वानखेडे , जालना समाजकल्याण विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या रमाई घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या ब्लँकेट, सतरंजी, आणि सौरदिवे पंचायत समिती कार्यालयात

ब्लँकेट, सतरंज्या पंचायत समितीत धूळखात पडून
गजानन वानखेडे , जालना
समाजकल्याण विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या रमाई घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या ब्लँकेट, सतरंजी, आणि सौरदिवे पंचायत समिती कार्यालयात गेल्या दोन महिन्यापासून प्राप्त झाले. परंतु प्रशासनाच्या वेळकाढू पणामुळे आलेल्या साहित्याचे गठ्ठे तसेच पडून आहे. त्यामुळे असल्याने बरेच साहित्य खराब होण्याच्या मार्गावर आहे.
दरवर्षी एस. सी .(अनुसुचीत जाती) च्या नागरीकांना रमाई घरकुल योजनेव्दोरे ब्लेकेट, सतरंजी, आणि सौरदिव्याचे वाटप करण्यात येते परंतु गेली अनेक महिन्यांपासून जालना तालुक्यासाठी आलेले गठ्ठे तसेच पडून असल्याने यापासून लाभार्थी वंचीत राहत असल्याचे चित्र आहे. सन २०१० - २०११ यावर्षीचे समाजकल्याण विभागाने रमाई घरकुल योजनेतील लाभार्थ्यासाठी ब्लँकेट, सतरंजी, सौरदिव्याचे जालना तहसील कार्यालयाला प्राप्त झाले होते. परंतु तहसील कार्यालयाच्या गोदामाला लागलेल्या आगीत हे संपूर्ण साहित्य वाटपविना जळून गेले होते. त्यामुळे अनेक लाभार्थी यापासून वंचीत राहले. २०१३ योजनेचे २१९७ संतरंजी, २४०० ब्लॅकेट, आणि ८०० सौरदिवे पंचायत समितीला प्राप्त झाले आहेत. परंतु आतापर्यंत ६०० लाभार्थ्यांना साहित्याचे वाटप करण्यात आले आहे. परंतु कर्मचारी वर्गाच्या उदासिन धोरणामुळे अद्यापही असून अनेकांच्या नावाची यादीच संबधित कर्मचारी वर्गाकडे व्यवस्थित नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे हे साहित्य वाटपविना पडून आहे.
लाभार्थ्यांपैकी ५० टक्के लाभार्थी यांनी स्थलांतर केले असून कामासंदर्भात ते पुण्या, मुंबईला गेले असल्याने त्यांच्या नावाने आलेले साहित्य कोणाला वाटप करावे, अशा संभ्रमात आम्ही आहोत, असे कर्मचारी सांगत आहेत. परंतु लाभार्र्थ्याचे आई, वडिलांनी याबाबात संपूर्ण कागदपत्रे, सर्व पुरावे देवून सुध्दा तहसील कार्यालयातील कर्मचारी आलेले साहित्य देण्यास टाळाटाळ करत असल्याचे अनेक नागरिकांनी सांगितले. ग्रामीण भागातून आलेल्या अनेकांना साहित्यांच्या किमतीपेक्षा जास्त तिकीटामंध्ये पैसे खर्च झाल्याचे सांगितले.
यासंदर्भात कार्यालयात येवून पडलेल्या ब्लँकेट, सतरंजी, सौरदिव्याच्या गठ्यांना कोणीच वालीच नसल्याचे चित्र दिसून आले.
अनेक लाभार्थ्यांना हे कागदं आणा, ते कागद ंआणा, असे म्हणून कर्मचारी परेशान करीत आहेत. आत्तापर्यंत देत असलेल्या वस्तुपेक्षाही जास्त आमच्या तिकीटाच्या पैसे गेले तरी आम्हाला अद्यापही कोणतीची सुविधा देण्यात आली नसल्याचे ग्रामीण भागातून आलेल्या लाभार्थ्यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले. साहित्य वाटप होत नसल्याने त्यांची गैरसोय होत आहे.
४पुरवठा उशिराने झाल्याने वस्तु वाटप करण्यात वेळ होत असल्याचे पंचायत समिती कार्यालयातील कर्मचारी यांनी नाव न छापण्याच्या अटीवर माहिती दिली. सध्या हजारो सतरंजी, ब्लँकेट , सौरदिवे वाटपाविना पडून असल्याने त्यांना उंदीर कतरत आहेत.