शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत महिलेस ब्लॅकमेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2020 18:25 IST

पैशासाठी महिलेला ब्लॅकमेल करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

ठळक मुद्देचार वर्षांपासून लैंगिक शोषण 

औरंगाबाद : पतीपासून विभक्त महिलेला आयुष्यभर सोबत राहाण्याचा विश्वास दाखवत मागील चार वर्षांपासून तिचे लैंगिक शोषण केले. त्यानंतर गेल्या महिन्यात तिच्याकडे ५ लाख रुपयांची मागणी केली. पैसे देण्यास नकार देताच त्या भामट्याने तिचे काढलेले अश्लील व्हिडिओ समाजमाध्यमावर व्हायरल करण्याची धमकी दिली. याप्रकरणी सदरील महिलेने सिडको ठाण्यात दोघाजणांविरुद्ध तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी लैंगिकशोषण व ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

अशोक विधाते (रा. राजेंद्रनगर, नारेगाव) व त्याचा मित्र सय्यद शकील (रा. मिसारवाडी), अशी आरोपींची नावे आहेत. एक ३० वर्षीय महिला गेली १० वर्षे घरगुती भांडणामुळे पतीपासून विभक्त राहत आहे. चार वर्षांपासून ती आपल्या दोन मुलांसोबत राजेंद्रनगर, नारेगाव येथे राहते. नारेगाव येथे तिचे कपडे विक्रीचे दुकान आहे. नेहमी कपडे खरेदीसाठी येणाऱ्या अशोक विधाते याच्यासोबत तिची ओळख झाली. अशोकने २४ एप्रिल २०१६ रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास फोन करून महिलेला टी.व्ही. सेंटर येथे बोलावून घेतले व तिला किरायाने घेतलेल्या विवेकानंदनगर, हडको येथील त्याच्या नातेवाईकाच्या घरी नेले. तुझ्यावर माझे प्रेम आहे. आयुष्यभर सोबत राहू, अशी थाप देऊन त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर वारंवार त्याने त्याच घरात सदरील महिलेच्या इच्छेविरुद्ध तिचे लैंगिक शोषण केले. 

गेल्या महिन्यात २५ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० वाजता अशोकने तिला फोन करून त्याच घरी बोलावून घेतले. तिच्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचार केला व मला ५ लाख रुपयांची गरज आहे. तू कोठूनही पैसे घेऊन ये, असे अशोक म्हणाला. तेव्हा सदरील महिलेने पैसे आणण्यास असमर्थता दर्शविली. पैसे देण्यास नकार देताच अशोकने तिचे काढलेले अश्लील व्हिडिओ दाखवत ते समाजमाध्यमावर व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर त्याच दिवशी रात्री ७.३० वाजता त्या महिलेला अशोक व त्याचा मित्र सय्यद शकील हे दोघ जण नारेगाव परिसरातील हॉटेल शाहीनजवळभेटले. तेव्हा शकीलने धमकी दिली की, अशोकने जरी ते व्हिडिओ डिलीट केले, तरी ते माझ्या मोबाईलमध्ये असून, मी ते सर्वांना दाखवू शकतो. घाबरलेल्या या महिलेने हा प्रकार आई व भावाला सांगितला. त्यानंतर सिडको ठाणे गाठून दोघा जणांविरुद्ध तक्रार दाखल केली. सहायक पोलीस आयुक्त निशिकांत भुजबळ हे याप्रकरणी तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादPoliceपोलिस