शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 17:46 IST

दौलताबाद घाटात भीषण प्रकार; प्रियकराने केली प्रेयसीची हत्या, नंतर स्वत: गेला पोलिसांकडे

शिऊर (छत्रपती संभाजीनगर): पैशाची मागणी आणि खोटा बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याने संतप्त प्रियकराने प्रेयसीचा डोकं दगडावर आपटून निर्घृण खून केला. मृतदेह दौलताबाद घाटात फेकून आरोपी स्वत: पोलीस ठाण्यात हजर झाला. गुरुवारी (२४ जुलै) रात्री ही थरकाप उडवणारी घटना घडली असून, शुक्रवारी सकाळी हा खळबळजनक प्रकार उघडकीस आला.

दिपाली गणेश आस्वार (वय १९, रा. माळीवाडा, ता. कन्नड) असे मृत युवतीचे नाव असून, ती सध्या कन्नड येथे बहिणीकडे राहत होती. मांडकी (ता. वैजापूर) येथील सुनील सुरेश खंडागळे (वय २१) याच्यासोबत गेल्या काही महिन्यांपासून तिचे प्रेमसंबंध होते. गुरुवारी सुनीलने वडिलांची दुचाकी घेऊन कन्नड गाठले आणि दिपालीला भेटले. दिवसभर ते वेगवेगळ्या ठिकाणी फिरले. संध्याकाळनंतर ते दौलताबाद घाटात गेले. तेथे दोघांमध्ये तीव्र वाद झाला. वादाचे मूळ कारण म्हणजे दिपालीने एक लाख रुपये मागितले आणि पैसे न दिल्यास "बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करेन," अशी धमकी दिली. या प्रकाराने संतप्त झालेला सुनील नियंत्रण हरपून गेला. रागाच्या भरात त्याने दिपालीचे डोके दगडावर आपटून तिचा जागीच खून केला. नंतर मृतदेह घाटात ढकलून देऊन तो घटनास्थळावरून निघून गेला.

थेट पोलिसांत जाऊन कबुलीघटनेनंतर काही तासांतच सुनीलने थेट शिऊर पोलीस ठाण्यात जाऊन खुनाची कबुली दिली. ही माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव रणखंब यांनी तत्काळ दौलताबाद पोलीस ठाण्याला माहिती दिली. पोलीस निरीक्षक रेखा लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह शोधून काढला. पोलीस तपासात मृतदेहाची ओळख दिपाली आस्वार हिच्या रूपात पटली. आरोपी सुनील खंडागळेला ताब्यात घेऊन त्याच्यावर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास दौलताबाद पोलीस करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरDoulatabad Fortदौलताबाद किल्ला