शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

भोंदूबाबांकडून ब्लॅकमेलिंग, मृत्यूची भीती दाखवून पैसे उकळले; छत्रपती संभाजीनगरमधील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 18:12 IST

बाहेर एक जण कुटुुंबाची माहिती घ्यायचा, मायक्रोफोनद्वारे ऐकून दुसरा घरात तीच माहिती पुरवून उकळायचा पैसे

छत्रपती संभाजीनगर : नंदीबैल घेऊन फिरत भविष्य सांगण्याच्या बहाण्याने सहा भोंदूबाबांच्या टोळीने नागरिकांना मृत्यूची भीती दाखवून ब्लॅकमेल केले. हा बोगस प्रकार एका सुज्ञ नागरिकाच्या लक्षात येताच त्याने त्यांचा पाठलाग सुरू केला. त्यात सहाही जण पळून गेले. या प्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

ओंकार प्रकाश शिराढोणकर हे एन-६ येथील साईनगरात कुटुुंबासह राहतात. गुरुवारी सकाळी ११ वाजता साईनगरमध्ये नंदीबैल घेऊन सहा जण फिरत होते. ओंकार यांचे ७८ वर्षीय वडील नंदीबैलासाठी तांदूळ घेऊन गेले. मात्र, बैलासोबतच्या व्यक्तीने पोळीभाजीची मागणी केली. त्यांचे संभाषण सुरूच असतानाच भोंदूंच्या टोळीपैकी एक जण थेट त्यांच्या घरात घुसला. त्याने ओंकार यांच्या मुलाला साथीदारांना पाणी देण्यास सांगून बाहेर पाठवून तो घरातच थांबला. त्याने अचानक शिराढोणकर कुटुंबाची माहिती देण्यास सुरुवात केली. पार्श्वभूमी, नातेवाईक, निधन झालेल्या व्यक्ती, आर्थिक उत्पन्न, पैठणचा कारखाना, सदस्यांची इत्यंभूत माहिती दिली.

तुमचा दहा दिवसांत मृत्यू होणारकौटुंबिक माहिती देताना भोंदूबाबाने अचानक ओंकार यांच्या पत्नीला तुमचा १० दिवसांत अर्धांगवायूने मृत्यू होणार असल्याचे सांगितले. यामुळे कुटुंबाला धक्का बसला. हे संकट टाळण्यासाठी ५० हजारांची मागणी केली. ओंकार यांनी नकार दिला. मात्र, पत्नीने साडेतीन हजार भोंदूबाबाच्या हाती टेकवले, तेव्हा त्याने मंत्र पुटपुटण्याचे नाटक केले.

नेमका काय होता प्रकार?सहा जणांच्या टोळीतील प्रत्येकाच्या कानात मायक्रोफोन होता. त्यांचा एक साथीदार घरात जातो. बाहेर उभे साथीदार त्याच वेळी कुटुुंबातील बाहेर आलेला सदस्य, शेजाऱ्यांशी बोलून माहिती मिळवून काॅलद्वारे त्याला ऐकवायचे. भविष्याची भीती घालून पैसे उकळायचे. पैसे देण्यास नकार दिल्यावर शिवीगाळ केल्याचेही स्थानिकांनी सांगितले.

थेट ठाण्यात नेलेपरिसरात अनेकांसोबत हा प्रकार घडल्याचे कळताच ओंकार यांनी त्यातील एकाला पुन्हा कॉल केला. कारखान्याबाबत विचारायचे सांगून परत बोलावले. टोळीतील एक भामटा तत्काळ परतला. त्याला कारमध्ये बसवून थेट सिडको पोलिस ठाण्यात नेले. ठाण्याबाहेरूनच तो पळाला. हे कळताच त्याचे पाच साथीदारही बैलासह पळून गेले. ओंकार यांची लेखी तक्रार सिडको पोलिसांनी घेतली. मात्र, सायंकाळी एका राजकीय पदाधिकाऱ्याने तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकल्याचेही ओंकार यांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Fake Baba Gang Blackmails Family, Threatens Death; Aurangabad Incident

Web Summary : A gang of fake babas in Aurangabad blackmailed a family by predicting death and demanding money. Using hidden microphones, they gathered information and intimidated victims. Police complaint filed, but political pressure hindered action.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर