सोडलेल्या प्रेयसीला केले ब्लॅकमेल
By Admin | Updated: July 6, 2016 00:19 IST2016-07-06T00:02:06+5:302016-07-06T00:19:16+5:30
औरंगाबाद : धमकी देत एका तरुणीला ब्लॅकमेल करणाऱ्या मजनूविरुद्ध मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

सोडलेल्या प्रेयसीला केले ब्लॅकमेल
औरंगाबाद : ‘एक लाख रुपये दे, नाही तर आता आपले लग्नापूर्वी लफडे होते, हे तुझ्या नवऱ्यालाच सांगतो’ अशी धमकी देत एका तरुणीला ब्लॅकमेल करणाऱ्या मजनूविरुद्ध मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
प्रवीण प्रभाकर कुलकर्णी (रा. जैननगरी, पिसादेवी) असे आरोपीचे नाव आहे. घटनेबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, आरोपी प्रवीणची काही महिन्यांपूर्वी मुकुंदवाडी परिसरात राहणाऱ्या एका २० वर्षीय तरुणीसोबत ओळख झाली.
हळूहळू त्यांच्या ओळखीचे रूपांतर घट्ट मैत्रीत आणि नंतर प्रेमात झाले. दोघांमधील प्रेम चांगलेच बहरले. दोघांनीही सोबत जगण्या मरण्याच्या आणाभाकाही घेतल्या; परंतु अचानक त्यांच्या प्रेमाला ‘ब्रेक’ लागला. त्यानंतर तरुणीच्या घरच्यांनी तिच्यासाठी स्थळ पाहिले आणि नात्यातील एका तरुणासोबत २६ जानेवारी रोजी तिचा विवाहही लावून दिला. तिकडे धूमधडाक्यात लग्न झाल्यानंतर तरुणी सर्व काही विसरून आपल्या संसारात रमली. गुण्यागोविंदाने ती नांदू लागली. इकडे प्रवीणच्या डोक्यात मात्र वेगळेच विचार घोळू लागले. अखेर चक्क आपल्या प्रेमाचा व्यवहार करण्याचा निर्णय घेतला.
फोन करून धमकावले
प्रवीण हा प्रेयसीच्या मागावरच होता. अखेर ती औरंगाबादला माहेरी आली आहे, हे त्याला समजले. मग त्याने तिच्या आईचा मोबाईल क्रमांक मिळविला