सोयाबीन बियाणांचा काळा बाजार?

By Admin | Updated: May 11, 2014 00:37 IST2014-05-11T00:19:14+5:302014-05-11T00:37:55+5:30

भास्कर लांडे , हिंगोली जिल्ह्यात १ लाख ९१ हजार ७२७ हेक्टर क्षेत्रावर पेरणी होणार्‍या सोयाबीनसाठी २ लाख ६५६ क्विंटल बियाणे लागणार आहे.

Black market of soybean seeds? | सोयाबीन बियाणांचा काळा बाजार?

सोयाबीन बियाणांचा काळा बाजार?

भास्कर लांडे , हिंगोली जिल्ह्यात १ लाख ९१ हजार ७२७ हेक्टर क्षेत्रावर पेरणी होणार्‍या सोयाबीनसाठी २ लाख ६५६ क्विंटल बियाणे लागणार आहे; परंतु जिल्ह्यात केवळ १ लाख ६५६ क्विंटल सोयाबीनचे बियाणे उपलब्ध आहे. परिणामी ४० हजार क्विंटल बियाणाची कमतरता असल्याने सोयाबीनच्या बियाणांचा यंदा मोठ्या प्रमाणात काळाबाजार होण्याची शक्यता आहे. सोयाबीन वगळता अन्य पिकांच्या क्षेत्रात प्रतिवर्षी झपाट्याने घट झाल्याचे पहावयास मिळते. मागील वर्षीपेक्षा यंदा अधिक प्रमाणात क्षेत्र घट झाली. गतवर्षीची पीक पद्धती पाहता यंदा कृषी विभागाने खरीप हंगामाचे नियोजन केले. त्यात कापसाबरोबर तेलवर्गीय आणि अन्नधान्य पिकांच्या क्षेत्रात मोठी दरी निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. आजपर्यंत नगदी पिकांत पर्याय नसल्यामुळे पिचलेल्या शेतकर्‍यांना सोयाबीनचा पर्याय उपलब्ध झाला आहे. विक्रमी उत्पादन जरी होत नसले तरी कापसाच्या तुलनेत सोयाबीन परवडणारे पीक म्हणून समोर आले. मर्यादित खर्चात बर्‍यापैैकी उत्पादन आणि दुबार पिकाची हमी नसली तरी शक्यता असते. म्हणून गतवर्षीच्या १ लाख ५३ हजार हेक्टर क्षेत्रात यंदा ३९ हजार हेक्टर क्षेत्राची वाढ कृषी विभागाने प्रस्तावित क्षेत्रात केली. एकूण इतर पिकांपेक्षा यंदा वाढलेले सोयाबीनचे क्षेत्र अधिक आहे. दुसरीकडे ज्वारी २५ वरून १६ हजार १०६, मुगाचे १९ हजार ५०० वरून १३ हजार ७९६, उडीद १३ हजार ५०० वरून १० हजार ४९८ घट झाली आहे. कापसाच्या क्षेत्रात १ लाख २० हजार वरून ९४ हजार ९५८ हेक्टर क्षेत्र कमी झाले आहे. तुरीच्या क्षेत्रात ३ हजाराने घट झाल्याचे पहावयास मिळते. या सर्व पिकांमध्ये झालेली घट सोयाबीनचे क्षेत्र वाढण्यात झाली. परिणामी १ लाख ९१ हजार ७२७ हजार हेक्टर क्षेत्रावर यंदा सोयाबीनचा पेरा होणार असल्याचा अनुमान कृषी विभागाने काढला. जवळपास ६० टक्के क्षेत्रावर होणार्‍या सोयाबीनच्या पेरणीसाठी २ लाख क्विंटलच्यावर सोयाबीनच्या बियाणांची आवश्यकता असते; परंतु यंदा जिल्ह्यात १ लाख ६५६ क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. उर्वरित ४० हजार क्विंटल बियाणे कोठून आणणार? हा प्रश्न निर्माण झाला आहे. उत्पादकांना प्रमाणित कंपन्यांचे बियाणे पेरणीसाठी लागणार असल्याने मागणी अधिक आहे. त्याप्रमाणात पुरवठा झाला नसल्यास बियाणांचा काळाबाजार होण्याची शक्यता आहे. दोन वर्षांपूर्वी सोयाबीनच्या बियाण्यांत काळाबाजार झाला होता. त्यामुळे बहुतांश शेतकर्‍यांचे सोयाबीन बियाणे उगवले नव्हते. यंदा देखील हीच स्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. म्हणून जिल्हाधिकार्‍यांनी खरीप हंगामाच्या आढावा बैैठकीत फ्लाईंग स्कॉडला सक्त तपासणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत; पण प्रतिवर्षीच या सूचना दिल्या जात असतात. मात्र यंदा सोयाबीनच्या बियाण्यांचा काळाबाजार रोखण्याचे आव्हान कृषी अधिकारी तसेच फ्लाईंग स्कॉडसमोर आहे. अधिकार्‍यांसमोर आव्हान सोयाबीन वगळता अन्य पिकांच्या क्षेत्रात प्रतिवर्षी झपाट्याने घट झाल्याचे दिसत आहे गतवर्षीची पीकपद्धती पाहता यंदा कृषी विभागाने खरीप हंगामाचे नियोजन केले असून त्यात कापसाबरोबर तेलवर्गीय आणि अन्नधान्य पिकांच्या क्षेत्रात मोठी दरी निर्माण झाल्याचे दिसून येत आहे नगदी पिकांत सोयाबीनचा पर्याय उपलब्ध झाला असून उल्लेखनीय फायदा जरी होत नसला तरी कापसाच्या तुलनेत सोयाबीन परवडणारे पीक ठरले आहे एकूण इतर पिकांपेक्षा यंदा वाढलेले सोयाबीनचे क्षेत्र अधिक असून गतवर्षीच्या १ लाख ५३ हजार हेक्टर क्षेत्रात ३९ हजार हेक्टर क्षेत्राची केली वाढ ज्वारी २५ वरून १६ हजार १०६, मुगाचे १९ हजार ५०० वरून १३ हजार ७९६, उडीद १३ हजार ५०० वरून १० हजार ४९८ हेक्टरवर घट जिल्ह्यात यंदा सोयाबीनचे १ लाख ६५६ क्विंटल बियाणे उपलब्ध असून उर्वरित ४० हजार क्विंटल बियाणे कोठून आणणार? हा प्रश्न झाला निर्माण खरीप हंगाम २०१२-१३ २०१४-२०१५ पिके एकूण क्षेत्र बियाणे क्विंटल एकूण क्षेत्र बियाणे क्विंटल सोयाबीन १ लाख ६५ १ लाख २३ १ लाख ९१७ १ लाख ५६५ कापूस १ लाख २० ६०,००० (पॅकेट) ९१ हजार ९५८ २,३८१ तूर ३२,२५० ३,२५० २७, ८९३ २, ३०१ ज्वारी २५,००० १,८७५ १६, १०६ १, ३०७ मूग १९,५०० १९५० १३,७९६ ७५८ किलो उडीद १३,५००१,३५० १०, ४९८ ६२९ किलो

Web Title: Black market of soybean seeds?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.