काळ्या बाजारात जाणारा गहू पकडला
By Admin | Updated: August 14, 2014 02:09 IST2014-08-14T01:58:19+5:302014-08-14T02:09:32+5:30
इस्लापूर : महाराष्ट्रातून आंध्रात जाणारा गहू मौजे गोंडजेवळी येथील तंटामुक्ती समिती व ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या हवाली केला.

काळ्या बाजारात जाणारा गहू पकडला
इस्लापूर : महाराष्ट्रातून आंध्रात जाणारा गहू मौजे गोंडजेवळी येथील तंटामुक्ती समिती व ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या हवाली केला. एक लाख ६३ हजार रुपायांचा एकूण माल तीन टेम्पोत निघाला. याप्रकरणी चार आरोपींना पोलिसांनी अटक केलीे तर एक फरार झाला.
एपी ०१/३८४७, एपी०१/९३२९, टीएसओ०युए ०१२१ या क्रमांकाच्या आॅटोमधून गहू जात होता. १२ आॅगस्ट रोजी रात्री गोंडजेवळी येथील एकाला साप चावल्याने ग्रामस्थ जागे होते. या दरम्यान तीन आॅटोमधून गहू जात असल्याची माहिती ग्रामस्थांना मिळाली. तंटामुक्त अध्यक्ष बळीराम पवार, फुलसिंग राठोड, जयराम राठोड, बालाजी जाधव यांनी याकामी मदत केली.
याप्रकरणी अ. गफूर अ. खदीर, अब्दूल वकील अब्दूल वामली, अ.गफूर म. अथर, वसंत हरी पवार, सुभाष जाधव आदींविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.(वार्ताहर)