काळी-पिवळीसारख्याच बसगाड्याही सुसाट !
By Admin | Updated: July 6, 2014 00:21 IST2014-07-06T00:03:54+5:302014-07-06T00:21:37+5:30
बीड : सध्या अनेक बसचालक भरधाव वेगात बस चालविताना दिसून येत आहेत.

काळी-पिवळीसारख्याच बसगाड्याही सुसाट !
बीड : सध्या अनेक बसचालक भरधाव वेगात बस चालविताना दिसून येत आहेत. हे बस चालक बीड शहरातून जाताना गर्दीच्या ठिकाणाहून भरधाव बस चालवत असल्याचे पहावयास मिळत आहे. त्यामुळे छोट्यामोठ्या वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून अपघातास निमंत्रण मिळत आहे.
शनिवारी सकाळी ११च्या सुमारास शहरातील शिवाजी पुतळ्याजवळून एम़एच.२० बी.एल.१७५४ ही बस बीडहून परळीला भरधाव वेगाने जात होती. अवजड वाहनांना ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात या बसचालकाने अनेक छोट्या-मोठ्या वाहनांना कट मारला. यावेळी रिक्षा, दुचाकी, चारचाकी वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या बसचालकाला काही वाहनधारकांनी विचारणा करण्याचा प्रयत्न केला असता त्याने आपली बस आणखीच भरधाव वेगाने चालविली. या बसचालकाविरूद्ध एका वाहनधारकाने विभागीय वाहतूक अधिकारी जी.एम. जगतकर यांच्याकडे तक्रारही दिली आहे. (प्रतिनिधी)