समांतरबाबत भाजपचा यू टर्न
By Admin | Updated: May 10, 2016 01:05 IST2016-05-10T00:51:55+5:302016-05-10T01:05:40+5:30
औरंगाबाद : विधानसभा निवडणुकांपूर्वी भाजपने बहुचर्चित समांतर जलवाहिनी प्रकल्पाला कडाडून विरोध दर्शविला होता. समांतरच्या मुद्यावर शिवसेनेचे चारही बाजंूनी

समांतरबाबत भाजपचा यू टर्न
औरंगाबाद : विधानसभा निवडणुकांपूर्वी भाजपने बहुचर्चित समांतर जलवाहिनी प्रकल्पाला कडाडून विरोध दर्शविला होता. समांतरच्या मुद्यावर शिवसेनेचे चारही बाजंूनी ‘पानिपत’ करण्याची कोणतीही संधी भाजपने सोडली नाही.
मागील आठवड्यात सातारा येथे झालेल्या एका कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनीही चार वर्षांत समांतर (जलवाहिनी) आलीच नाही, असा टोला सेनेला लावला होता. समांतर प्रकल्पाला भाजपचा सर्वत्र विरोध सुरू असताना आ. अतुल सावे यांनी हा प्रकल्प चांगला असून, महापालिकेने तो वेळेवर पूर्ण करून घ्यावा, असा सल्ला दिला. भाजपच्या या यू टर्नवर सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
सोमवारी आ. अतुल सावे यांनी मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांची भेट घेतली. २४ कोटी रुपयांच्या निधीतील रस्त्यांची कामे त्वरित मार्गी लावावीत, कैलासनगर ते एमजीएम रस्त्याचे (पान २ वर)
मजलिस-ए-इत्तेहाद-उल मुस्लिमिन (एमआयएम) पक्षाने सुरुवातीपासून समांतर जलवाहिनीला कडाडून विरोध केला आहे. सोमवारी पक्षाचे आ. इम्तियाज जलील यांनी मनपा आयुक्तांना एक पत्र दिले. या पत्रात जनविरोधी समांतर प्रकल्प रद्द करा, अशी मागणी केली आहे.
जलवाहिनी टाकण्याचे काम त्वरित महाराष्ट्र जीवन प्राधिकरणावर सोपवावे, असेही त्यांनी म्हटले आहे. सर्वसाधारण सभेत गरज पडल्यास प्रशासनाने मतदान घ्यावे, अशी मागणीही जलील यांनी केली आहे.