शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
6
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
9
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
10
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
11
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
12
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
13
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
14
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
15
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
16
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
17
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
18
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
19
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
20
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

सत्ता,संपत्तीच्या जोरावर भाजपचा विजय, त्यामुळे त्यांचा जुना कार्यकर्ता नाराज: अंबादास दानवे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 17:36 IST

"भ्रष्टाचार हाच भाजपचा आत्मा!" अंबादास दानवेंची बोचरी टीका

छत्रपती संभाजीनगर: "भारतीय जनता पक्ष आता केवळ सत्ता आणि संपत्तीच्या जोरावर निवडणुका लढवत आहे. या प्रक्रियेत ज्यांनी रक्ताचं पाणी करून पक्ष वाढवला, तो मूळ जुना कार्यकर्ता आज स्वतःच्याच पक्षात असुरक्षित आणि नाराज आहे," असा घणाघाती आरोप शिवसेना (उबाठा) नेते अंबादास दानवे यांनी केला आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दानवे यांनी भाजपच्या कार्यपद्धतीवर आणि शिवसेनेच्या आगामी वाटचालीवर सविस्तर भाष्य केले.

नितीन गडकरींचा उल्लेख आणि भाजपवर प्रहारदानवे म्हणाले की, नितीन गडकरींसारखे ज्येष्ठ नेते तत्त्वज्ञानाची भाषा करतात, मात्र पक्षात त्यांचे कोणीही ऐकत नाही. सध्याच्या भाजपमध्ये भ्रष्टाचार हाच पक्षाचा आत्मा झाला असून, मते विकत घेण्याची संस्कृती रूढ झाली आहे. मात्र, जनता या 'वांझोट्या' सभांना आणि पैशांच्या राजकारणाला कंटाळली असून लवकरच सत्याचा विजय होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आदित्य ठाकरे मैदानात, वंचितसोबत युतीचे संकेत शिवसेनेचा अधिकृत प्रचार २६ तारखेपासून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सुरू होणार आहे. तसेच वंचित बहुजन आघाडीसोबत जागावाटपाची अंतिम बोलणी सुरू असून लवकरच चित्र स्पष्ट होईल, असेही त्यांनी सांगितले. नगरपालिका निकालांचा परिणाम महानगरपालिका निवडणुकीवर होणार नाही, कारण महानगरपालिकेचे मतदार आणि तिथली समीकरणे पूर्णपणे वेगळी असतात, असे स्पष्ट करत त्यांनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले.

English
हिंदी सारांश
Web Title : BJP's victory due to power, wealth; old workers upset: Danve

Web Summary : Ambadass Danve accuses BJP of relying on power and wealth for victories, alienating loyal workers. He criticizes the party's corruption and money politics, expressing confidence in eventual truth triumph. Aditya Thackeray will lead Shiv Sena's campaign, and alliance talks with Vanchit Bahujan Aghadi are underway.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६Chhatrapati Sambhaji Nagar Municipal Corporation Electionछत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक २०२६Ambadas Danweyअंबादास दानवेLocal Body Electionमहाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निकाल २०२५