भाजपाची लातुरात ‘तिरंगा यात्रा’

By Admin | Updated: August 18, 2016 00:57 IST2016-08-18T00:49:28+5:302016-08-18T00:57:15+5:30

लातूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार भारतीय जनता पार्टीच्या वतीने खा.डॉ. सुनील गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्यदिनी ‘तिरंगा यात्रा’ काढण्यात आली.

BJP's 'Tiranga Yatra' in Latur | भाजपाची लातुरात ‘तिरंगा यात्रा’

भाजपाची लातुरात ‘तिरंगा यात्रा’


लातूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार भारतीय जनता पार्टीच्या वतीने खा.डॉ. सुनील गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्यदिनी ‘तिरंगा यात्रा’ काढण्यात आली. या यात्रेचा समारोप बुधवारी क्रीडा संकुल येथे करण्यात आला.
स्वातंत्र्यदिनी विवेकानंद चौक येथून या यात्रेचा शुभारंभ करण्यात आला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, शाहू चौक, गंजगोलाई, हनुमान चौक, मध्यवर्ती बसस्थानक, गांधी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क, अशोक हॉटेल, शिवाजी चौक आणि बुधवारी क्रीडा संकुल येथे या यात्रेचा समारोप करण्यात आला. खा.डॉ. सुनील गायकवाड यांच्यासह भाजपाचे जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे, शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी, मोहन माने, स्वाती जाधव, अ‍ॅड. शैलेश गोजमगुंडे, अ‍ॅड. शेखर हविले, सिद्धार्थ कवठेकर, पप्पू धोत्रे, बालाजी गवळी, जमील नाना, अ‍ॅड. प्रदीप आकनगिरे, गीता गौड, ज्योती पांढरे, उषा वायचळे, अलका शिंदे, शोभा कोंडेकर, रेणुका बोरा, सुनीता उबाळे, अनिता रसाळ, प्रवीण अंबुलगेकर आदींचा सहभाग होता. (प्रतिनिधी)

Web Title: BJP's 'Tiranga Yatra' in Latur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.