शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभेसाठी भाजपची व्यूहरचना; जे. पी. नड्डांच्या उपस्थितीत आज औरंगाबादेत शक्तिप्रदर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2023 12:16 IST

मराठवाड्यात औरंगाबादसह हिंगोली, परभणी आणि उस्मानाबाद लोकसभा लढवण्यासाठी भाजप पूर्णपणे संघटनात्मक तयारी करीत आहे.

औरंगाबाद : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची सोमवारी (दि. २ जानेवारी) मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर सायंकाळी ५.३० वाजता सभा होणार असून, भाजप लोकसभा निवडणुकीचे रणशिंग औरंगाबादेतून फुंकणार आहे. सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, सहकार मंत्री अतुल सावे यांच्यासह प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे, आ. हरिभाऊ बागडे, आ. प्रशांत बंब, माजी आ. पंकजा मुंडे, प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर, शहराध्यक्ष शिरीष बोराळकर यांची उपस्थिती असेल.

अध्यक्ष नड्डा दि. २ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता वेरूळ घृष्णेश्वर मंदिरात दर्शनाला जातील. त्यांच्या हस्ते वेरूळ येथील अहिल्यादेवी कुंडाच्या सौंदर्यीकरणाचा व साउंड व लाईट शोच्या कामाचे भूमिपूजन होणार आहे. तेथून ते सभेसाठी शहरात येतील. सभेनंतर वैजापूर, कन्नड, गंगापूर व शहरातील तीन अशा सहा मतदारसंघांतील भाजप कोअर कमिटीची ते बैठक घेतील. नंतर शहरातील काही महत्त्वाच्या नागरिकांशी ते चर्चा करतील. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ भाजप लढणार असून, सभेला सहा विधानसभा मतदारसंघांतील पदाधिकारी, कार्यकर्ते, भाजपप्रेमी, नागरिक उपस्थित राहतील, अशा व्यवस्था केली आहे. दरम्यान, रविवारी सायंकाळी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. कराड, सहकार मंत्री सावे, शहराध्यक्ष बोराळकर यांनी सभेच्या पूर्वतयारीचा, आसनव्यवस्था, स्टेजचा आढावा घेतला.

लोकसभेसाठी तयारीदेशातील १४४ लोकसभा मतदारसंघांवर विशेष लक्ष देण्यात येत आहे. राज्यात शिवसेनेकडे असलेल्या १८ जागांसाठी भाजप व्यूहरचना आखत आहे. देशात भाजपने ४०० जागा लढविण्याचा निश्चय केला आहे. त्याचे नियोजन म्हणून अनेक केंद्रीय मंत्र्यांना विविध लोकसभा मतदारसंघ संघटनात्मक मजबुती करण्यासाठी वाटून दिले आहेत. मराठवाड्यात औरंगाबादसह हिंगोली, परभणी आणि उस्मानाबाद लोकसभा लढवण्यासाठी भाजप पूर्णपणे संघटनात्मक तयारी करीत आहे.

टॅग्स :BJPभाजपाAurangabadऔरंगाबादlok sabhaलोकसभा