शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाचे मराठवाड्यावर विशेष लक्ष; विधानसभेसाठी अमित शाह छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर

By विकास राऊत | Updated: September 23, 2024 14:23 IST

लोकसभा निवडणूकीत मराठवाड्यात भाजपला एकही जागा जिंकता आली नव्हती

छत्रपती संभाजीनगर: आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मंगळवारी (२४ सप्टेंबर) शहर दौऱ्यावर येत आहे. मराठवाड्यातील पदाधिकाऱयांची बैठक घेत ते विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

आगामी विधानसभा निवडणूकीसाठी सर्वच राजकीय पक्ष जोमाने तयारीला लागले आहेत. नियोजनासाठी भाजपचेही बैठकासत्र सुरु आहे. छत्तीसगड येथील भाजपचे काही नेतेमंडळ देखील नुकतेच जिल्ह्यात येऊन गेले. आता पुढील नियोजनासाठी म्हणून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मंगळवारी सायंकाळी शहरात दाखल होणार आहे. मराठवाड्यातील प्रमुख पदाधिकारी यांची बैठक घेत ते विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहे.  एमजीएम परिसरातील रुख्मिणी सभागृहात सायंकाळी पाच वाजता बैठकीस सुरुवात होईल, अशी माहिती भाजपच्या सूत्रांनी दिली.

या बैठकीस केंद्रीय पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मराठवाड्यातील नेतेमंडळी, प्रमुख पदाधिकारी आदी उपस्थितीत असतील. दरम्यान, लोकसभा निवडणूकीत मराठवाड्यात भाजपला यश मिळाले नाही. त्यामुळे आता विधानसभेत भाजप काय रणनिती आखणार पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

असा आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा दोन दिवसीय जिल्हा दौरा - मंगळवार दि.२४ रोजी सायं. सव्वा सहा वा. छत्रपती संभाजीनगर विमानतळ येथे आगमन व एमजीएम कॅम्पस कडे प्रयाण, सायं.साडेसहा वा. रुक्मिणी हॉल, सिडको एन ६, एमजीएम कॅम्पस येथे आगमन व बैठकीसाठी राखीव, ऱात्री ८ वा. ३५ मि. नी.मोटारीने हॉटेल रामा इंटरनॅशनल कडे प्रयाण, रात्री.८ वा. ४० मि. नी हॉटेल रामा इंटरनॅशनल येथे आगमन, रात्री सव्वा नऊ वा. बैठकीसाठी राखीव. नंतर मुक्काम.- बुधवार दि.२५ रोजी सकाळी ११ वा. हॉटेल रामा इंटरनॅशनल येथून मोटारीने छत्रपती संभाजीनगर विमानतळाकडे प्रयाण, सकाळी ११ वा. १० मि. नी. छत्रपती संभाजीनगर विमानतळ येथे आगमन व सकाळी ११ वा. १५ मि. नी विमानाने नाशिककडे प्रयाण.

टॅग्स :Amit Shahअमित शाहAurangabadऔरंगाबादBJPभाजपाvidhan sabhaविधानसभा