शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

मनपा, जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर भाजपचा ‘मोदी@११’ चा नारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 19:06 IST

मराठवाड्याला भरपूर दिल्याचा भाजपचा दावा

छत्रपती संभाजीनगर : महापालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणूक तोंडावर भाजपने शहर व ग्रामीण भागात ‘मोदी@११’ चा नारा देण्यास सुरुवात केली आहे. या उपक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजवरच्या कार्यकाळात समाजाेपयोगी आणलेल्या योजनांचे प्रदर्शनही आयएमए हॉलमध्ये भरविण्यात आले आहे. तसेच, शहर व ग्रामीणमधील मंडळांतर्गत बैठका घेण्यात येणार आहेत. बुथ लेव्हल, चौपाल सभा, प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये सभा घेऊन ‘मोदी@११’ चा नारा देण्यात येणार आहे.

खा. डॉ. भागवत कराड, ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे, आ. अनुराधा चव्हाण, शहराध्यक्ष किशोर शितोळे यांनी किरण पाटील, लक्ष्मीकांत थेटे, जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाट, हर्षवर्धन कराड, समीर राजूरकर, जालिंदर शेंडगे यांच्या उपस्थितीत ‘मोदी@११’ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती सोमवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली.

११ वर्षांत मराठवाड्यात आयआयटी, एम्स का आले नाही?११ वर्षांत मराठवाड्याला भरपूर मिळाल्याचा दावा भाजपने केला. मराठवाड्याचा विकास झाला, तर विकसित भारतात त्याचा समावेश असेलच, या प्रश्नाला बगल देत लोककल्याणकारी योजनांसह उद्योगांच्या गुंतवणुकीचा हवाला देत भाजप नेत्यांनी पत्रकारांच्या थेट प्रश्नाला उत्तरे देणे टाळले. आयआयटी नागपूरला गेले. एम्स मिळाले नाही. भारतमाला योजना संपुष्टात येत असून, शहरातील अखंड उड्डाणपुलाचे काय झाले? यावर खा. डॉ. कराड म्हणाले, शहरातील अखंड उड्डाणपुलाचा प्रस्ताव पाइपलाइनमध्ये आहे. त्याला मंजुरी मिळेलच. एम्स येण्यासाठी निकष असतात, त्यानुसार प्रयत्न सुरू आहेत. शहराध्यक्ष शितोळे म्हणाले, वजन कमी करू, सुदृढ राहू, मेडिकल कॉलेजऐवजी रस्ते, पाणी, वीज देऊ असा विचार ‘मन की बात’ मधून पंतप्रधान देत आहेत. त्यामुळे मेडिकल कॉलेजऐवजी आरोग्यदायी होण्याकडे आपला कल असला पाहिजे.

शहर कार्यकारिणी पुढच्या महिन्यातभाजप शहर कार्यकारिणीची निवड पुढच्या महिन्यांत होईल, असे शितोळे म्हणाले. मंडळ अध्यक्ष निवड झाली असून, उर्वरित कार्यकारिणी स्थापन होईल. त्यानंतर शहर कार्यकारिणीतील सरचिटणीस, उपाध्यक्ष, चिटणीस, सदस्यांची निवड होईल.

टॅग्स :BJPभाजपाchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरMarathwadaमराठवाडा