बाजाराच्या जागेसाठी भाजपाचा मोर्चा

By Admin | Updated: August 17, 2014 00:06 IST2014-08-17T00:06:09+5:302014-08-17T00:06:09+5:30

माजलगाव : येथील आठवडी बाजाराचा वाद दिवसेंदिवस चिघळतच चालला आहे़ हा आठवडी बाजार बसस्थानकामागील बाजूस असलेल्या सर्वे ऩ ३८० मध्ये भरविण्यात यावा,

BJP's front for market place | बाजाराच्या जागेसाठी भाजपाचा मोर्चा

बाजाराच्या जागेसाठी भाजपाचा मोर्चा





माजलगाव : येथील आठवडी बाजाराचा वाद दिवसेंदिवस चिघळतच चालला आहे़ हा आठवडी बाजार बसस्थानकामागील बाजूस असलेल्या सर्वे ऩ ३८० मध्ये भरविण्यात यावा, या मागणीसाठी शनिवारी भाजपाच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आहे़
येथील बाजाराच्या जागेसाठी शनिवारी शेतकरी, व्यापारी आक्रमक झाले होते़ भाजपाचे भाई गंगाभिषण थावरे यांच्या मार्गदर्शनखाली हजारो शेतकरी, व्यापारी यांनी शनिवारी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला़ सर्वे ऩ ३०८ हा मनूर रोड जवळ येत असून शहरातील नागरिक, शेतकरी, व्यापारी यांच्यासाठी हा बाजार खुप दूर होत आहे़ विशेष म्हणजे एवढ्या दूर असूनही येथे व्यापारी, शेतकरी, नागरिक यांना कुठल्याही सोयी सुविधा उपलब्ध नाहीत़ या जागेवर बाजार भरविणे कोणालाही परवडणारे नसल्याने हा आठवडी बाजार बसस्थानकाच्या पाठीमागील सर्वे नं़ ३८० मध्ये भरविण्यात यावा, ज्यामुळे हा बाजार सर्वांसाठी सोयीचा होईल, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे़ यासाठी मोंढ्यातून शेतकरी व व्यापाऱ्यांचा तहसीलवर मोर्चा काढण्यात आला़ मोर्चेकऱ्यांनी तहसीलदार डॉ़ अरुण जऱ्हाड यांना निवेदन दिले़
या मोर्चामध्ये भाई थावरे यांच्यासह शेतकरी, व्यापारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते़ (वार्ताहर)

Web Title: BJP's front for market place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.