हिंगोलीत भाजपाचे धरणे आंदोलन
By Admin | Updated: August 17, 2015 00:05 IST2015-08-17T00:05:45+5:302015-08-17T00:05:45+5:30
हिंगोली : भारतीय जनता पार्टी हिंगोली शाखेच्या वतीने १६ आॅगस्ट रोजी संसदेत गोंधळ घालणाऱ्या काँग्रेस खासदाराच्या निषेधार्थ शहरात धरणे आंदोलन करण्यात आले.

हिंगोलीत भाजपाचे धरणे आंदोलन
हिंगोली : भारतीय जनता पार्टी हिंगोली शाखेच्या वतीने १६ आॅगस्ट रोजी संसदेत गोंधळ घालणाऱ्या काँग्रेस खासदाराच्या निषेधार्थ शहरात धरणे आंदोलन करण्यात आले.
संसदेचे चार आठवड्याचे अधिवेशन चालू असताना संसदेमध्ये काँगे्रसच्या खासदारांनी विकासाचा मुद्दा उपस्थित न करता गोंधळ घातल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
या संदर्भात रविवारी सकाळी ११ वाजता पालकमंत्री दिलीप कांबळे यांच्या नेतृत्त्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले. आ. तानाजी मुटकुळे, माजी खासदार सुभाष वानखेडे, जिल्हाध्यक्ष बाबाराव बांगर, जिल्हा सरचिटणीस बी. डी. बांगर, सुरजितसिंग ठाकूर, पांडुरंग पाटील, अॅड. प्रभाकर भाकरे, मिलिंंद यंबल, नगरसेवक गणेश बांगर, राज तांदळे, फुलाजी शिंदे, उमेश नागरे, संतोष टेकाळे, प्रभात सोनी, बंडू कऱ्हाळे, बाबा घुगे, संजय ढोके, संजय खंडेलवाल, उत्तमराव जगताप, सुभाष लदनिया, सखाराम मुटकुळे, उमेश गुठ्ठे, रवी कान्हेड, संदीप वाकडे, सुधाकर पाटील, संजय कावडे, सखाराम इंगळे, नारायण बांगर, गणेश श्ािंदे बालाजी क्षीरसागर, माणिक लोंढे, नागेश बांगर, दिलीप शर्मा, पिंटू जाधव, मुदीराज, शंकर मुधोळकर हजर होते. (प्रतिनिधी)