शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाचा मोठा प्लॅन! झारखंड, छत्तीसगडचे १६ आमदार छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2024 12:01 IST

आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या एका रणनीतीचा भाग असल्याची चर्चा

छत्रपती संभाजीनगर: झारखंड, छत्तीसगड विधनसभेतील तब्बल १६ आमदार शुक्रवारी रात्रीपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाले आहेत. हे सर्व आमदार भाजपाचे असून त्यांच्यासोबत पक्षाचे काही उच्चपदाधिकारी देखील असल्याची माहिती आहे. शहरातील दोन हॉटेलमध्ये निवास आणि बैठकीची व्यवस्था करण्यात आली आहे. दोन्ही हॉटेल बाहेर मोठा पोलिस बंदोबस्त असून ही बैठक आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या एका रणनीतीचा भाग असल्याची चर्चा आहे.

महाराष्ट्रात येत्या काही दिवसांत विधानसभा निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा मोठी रणनीती ठरवत असल्याची माहिती आहे. राज्यातील विभागवार तयारीच्या अनुषंगाने भाजपने मराठवाड्यात जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून झारखंड, छत्तीसगड येथील भाजपाचे तब्बल १६ आमदार छत्रपती संभाजीनगर येथे शुक्रवारी रात्रीपासून शनिवारी सकाळपर्यंत दाखल झाले. यावेळी छत्तीसगड भाजपाचे काही वरिष्ठ पदाधिकारी देखील त्यांच्या सोबत आहेत. शहरातील दोन मोठ्या हॉटेलमध्ये सर्वांची व्यवस्था करण्यात आली आहे. एका हॉटेलमध्ये निवास तर दुसऱ्या हॉटेलमध्ये बैठकीची व्यवस्था आहे.  स्थानिक भाजपा पदाधिकारी समीर राजूरकर आणि अहमदनगर येथील प्रकाश गांधी येथील समन्वयक आहेत. आज सकाळी ११ वाजेपासून राज्यातील भाजपा पदाधिकारी आणि झारखंड, छत्तीसगडचे आमदार, पदाधिकारी यांची एक महत्वपूर्ण बैठक सुरू झाली आहे. ही बैठक आगामी विधानसभेच्या तयारीचा भाग असल्याची माहिती आहे. 

मराठवाड्यातील २५ जागांवर लक्षभाजपाने मराठवाड्यातील विधानसभेच्या २५ जागांवर लक्ष केंद्रित केले आहे. या जागांवर विजय कसा मिळवायचा यावरच या बैठकीत खल होणार आहे.  बैठकीत उपस्थित झारखंड, छत्तीसगडमधील आमदार आणि भाजपा पदाधिकारी यांना या मतदारसंघांची जबाबदारी देण्यात येणार असल्याची माहिती आहे. तसेच उद्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शहरात असून त्यांच्यासोबत देखील या सर्वांची बैठक होणार असल्याची सुत्रांची माहिती आहे. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादBJPभाजपाvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूक 2024