पालिकेत भाजपाचे बोंबाबोंब आंदोलन
By Admin | Updated: December 3, 2015 00:31 IST2015-12-03T00:26:12+5:302015-12-03T00:31:46+5:30
तुळजापूर : येथील साळुंके गल्लीतील रस्त्याच्या सिमेंट काँक्रीटच्या कामाचे बुधवारी निवेदन देवूनही न.प. ने काम केले नाही, याच्या निषेधार्थ भाजपा-सेनेच्या

पालिकेत भाजपाचे बोंबाबोंब आंदोलन
तुळजापूर : येथील साळुंके गल्लीतील रस्त्याच्या सिमेंट काँक्रीटच्या कामाचे बुधवारी निवेदन देवूनही न.प. ने काम केले नाही, याच्या निषेधार्थ भाजपा-सेनेच्या वतीने नगर परिषद कार्यालयात बोंबमारो आंदोलन करण्यात आले.
यावेळी आंदोलनकर्त्यांनी जुनी कन्या प्रशाला ते पावणारा गणपती या रस्त्याच्या सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम दोन महिन्यापासून मागणी करुनही पूर्ण केले नाही. व १ डिसेंबरपर्यंत काम न केल्यास २ डिसेंबर रोजी बोंबमारो आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही दिला होता. त्या अनुषंगाने बुधवारी दुपारी १२ वाजता न.प. मुख्याधिकारी राजीव बुबणे यांना घेराव घालून आंदोलनकर्त्यांनी बोंब मारली. यावेळी नगरसेवक गणेश कदम, माजी उपाध्यक्ष दिलीप गंगणे यांनी आंदोलनकर्त्यांची समजूत घालून त्यांना शांत केले. त्यानंतर मुख्याधिकारी बुबणे यांनी तांत्रिक कारणाअभावी या रस्त्याचे काम राहिले आहे. परंतु आंदोलनकर्त्यांची सिमेंंट काँक्रीटचा आग्रह कायम असेल तर ते काम आजच सुरु करु असे सांगून अभियंता फारुकी यांना या रस्त्याचे काम २४ तासात पूर्ण करण्याचे आदेश दिले. यानंतर आंदोलनकर्त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले. या आंदोलनात भाजपाचे इंद्रजीत साळुंके, सेनेचे शहरप्रमुख सुधीर कदम यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)