शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

"भाजपचा ईडीच्या माध्यमातून 'काँग्रेस तोडो'चा प्रयत्न"; औरंगाबादेत कॉंग्रेसची आक्रमक निदर्शने

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2022 17:34 IST

काँग्रेस पक्षाने उदयपूरच्या शिबिरामध्ये 'भारत जोडो'ची भूमिका घेतली होती. याची धास्ती घेऊन भाजपने ईडीच्या माध्यमातून 'काँग्रेस तोडो'चा प्रयत्न सुरु आहे

औरंगाबाद: सोनिया गांधी यांची ईडी अधिकारी चौकशी करत आहेत. मात्र, सोनिया गांधी यांच्या ईडी चौकशीला विरोध करत देशभर काँग्रेस नेते, कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. औरंगाबादेतही आज दुपारी विभागीय आयुक्तालयासमोर मराठवाडास्तरीय निदर्शने करण्यात आली. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येऊन ईडीच्या चौकशीचा निषेध करण्यात आला.  

औरंगाबाद येथे मराठवाडा विभागाच्यावतीने काँग्रेस कमिटीतर्फे आयोजित आंदोलनामध्ये सोनिया गांधी यांच्या ईडी चौकशीचा निशेष व्यक्त करण्यात आला. भाजप सरकार सातत्याने गांधी परिवारावर सूडबुद्धीने कारवाई करत असून देशातील लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न करत आहे, अशा तीव्र प्रतिक्रिया आंदोलकांनी व्यक्त केल्या. काँग्रेस पक्षाने सातत्याने जनतेचे प्रश्न उपस्थित केल्यामुळे केंद्रातील भाजप सरकारच्या पायाखालची वाळू सरकली आहे. याचमुळे काँग्रेसविरोधात केंद्रीय यंत्रणांचा वापर करत भाजप दडपशाही करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.

काँग्रेस पक्षाने उदयपूरच्या शिबिरामध्ये 'भारत जोडो'ची भूमिका घेतली होती. याची धास्ती घेऊन भाजपने ईडीच्या माध्यमातून 'काँग्रेस तोडो'चा प्रयत्न सुरु आहे, असा संताप आंदोलकांनी केला. तसेच तपास यंत्रणांचा गैरवापर आणि पोलिसांना पुढे करून सुरु असलेल्या या दडपशाहीला कधीच भीक घालणार नाही. मोदी सरकारच्या मनमानी कारभाराविरोधात कॉंग्रेस लोकशाही मार्गाने संघर्ष करत राहील, असा इशारा देखील आंदोलकांनी दिला. आंदोलनात मराठवाड्यातील सर्व जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

टॅग्स :congressकाँग्रेसAurangabadऔरंगाबादDivisional Commissioner Office Aurangabadऔरंगाबाद विभागीय आयुक्तालयagitationआंदोलन