फुलंब्रीत भाजपचे महावितरणसमोर आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:06 IST2021-02-06T04:06:51+5:302021-02-06T04:06:51+5:30
फुलंब्री : तालुका भाजपने शुक्रवारी येथील महावितरण कार्यालयासमोर आंदोलन करुन गेटला टाळे ठोकले. महावितरणने वीज ग्राहकांना मोठ्या प्रमाणात वाढीव ...

फुलंब्रीत भाजपचे महावितरणसमोर आंदोलन
फुलंब्री : तालुका भाजपने शुक्रवारी येथील महावितरण कार्यालयासमोर आंदोलन करुन गेटला टाळे ठोकले. महावितरणने वीज ग्राहकांना मोठ्या प्रमाणात वाढीव वीजबिले दिली आहेत. आता या वीजबिलांची सक्तीने होत असलेली वसुली थांबवावी, शासनाने हे संपूर्ण वीजबिल माफ करावे, ग्राहकांना दिलेल्या नोटीस परत घ्याव्यात, अशा मागण्या आंदोलनकर्त्यांनी यावेळी केल्या. या आंदोलनाचे नेतृत्व माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केले. यावेळी तालुकाध्यक्ष सुहास सिरसाठ, जिल्हा परिषद सदस्य शिवाजी पाथ्रीकर, अनुराधा चव्हाण, योगेश मिसाळ, नरेंद्र देशमुख, बाळासाहेब तांदळे, हौसाबाई काटकर, ऐश्वर्या गाडेकर, बाळासाहेब सोटम, एकनाथ ढोके, अजय शेरकर, गजानन नागरे, अकबर पटेल, असेफ पटेल, राजू तुपे, संजय त्रिभुवन यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटो कॅप्शन : फुलंब्रीत झालेल्या आंदोलनादरम्यान महावितरणच्या गेटला हरिभाऊ बागडे व कार्यकर्ते यांनी टाळे ठोकले.
050221\rauf usman shaik_img-20210205-wa0022_1.jpg
फुलंबीत आंदोलनादरम्यान महावितरणच्या गेटला टाळे ठोकताना आ. हरिभाऊ बागडे व आदी.