छावणी वाटपावरून भाजप कार्यकर्त्यांत नाराजी

By Admin | Updated: August 23, 2015 23:48 IST2015-08-23T23:25:23+5:302015-08-23T23:48:11+5:30

व्यंकटेश वैष्णव , बीड स्व. गोपीनाथ मुंडे यांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेले भाजप कार्यकर्ते नेत्तृत्वावर नाराज असल्याचा प्रत्यय मागील चार दिवसात आला

BJP workers protest from allotment of camp | छावणी वाटपावरून भाजप कार्यकर्त्यांत नाराजी

छावणी वाटपावरून भाजप कार्यकर्त्यांत नाराजी


व्यंकटेश वैष्णव , बीड
स्व. गोपीनाथ मुंडे यांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेले भाजप कार्यकर्ते नेत्तृत्वावर नाराज असल्याचा प्रत्यय मागील चार दिवसात आला. दोन दिवसांपूर्वी झालेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या बैठकीत कार्यकर्त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. आता छावणीचा ठेका भाजपातील काही आमदार स्वत: घेत असल्याने कार्यकर्त्यांना छावण्याही चालविण्यास मिळत नसल्याने कार्यकर्त्यांनी नाराजीचा सूर आळवला.
सत्ताधारी पक्षात गटातटाचे राजकारण असणे, हे जिल्ह्यासाठी नवीन नाही. यापूर्वीच्या सत्ताधाऱ्यांमध्येही गटतट होते. आता भाजपाच्या गोटात देखील गट पडल्याचे उघड पहावयास मिळत आहे. गत आठवड्यात तालुक्यातील कपिलधार येथे भाजप कार्यकर्त्यांची बैठक झाली. यावेळी भाजप प्रदेशचे संघटन मंत्री राजेंद्र फडके, खा. डॉ. प्रीतम मुंडे यांची उपस्थिती होती. याप्रसंगी कार्यकर्त्यांनी विविध कामाचे ठेके विशिष्ठ गटाच्या कार्यकर्र्त्यांनाच मिळत असल्याने नाराजी व्यक्त केली होती.
जिल्हयात प्रचंड दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे, या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात चारा छावण्या सुरू करण्याची लगबग सुरू आहे. छावणीच्या ठेक्यासाठी ४० ते ४५ प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे आले आहेत. पैकी २९ च्या जवळपास प्रस्ताव एकट्या आष्टी तालुक्यातील आहेत. आष्टी संदर्भात गतवर्षी छावणी चालविण्याचा अनुभव असलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी यावेळी देखील प्रस्ताव दाखल केले आहेत. मात्र, सहकारी संस्थेच्या नावाखाली भाजपातील सत्ताधाऱ्यांनाच छावण्यांचे ठेके दिले आहेत. यामुळे रविवारी भाजपाच्या दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांमध्ये नाराजी दिसून आली.

Web Title: BJP workers protest from allotment of camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.