शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

महापालिकेसाठी भाजप राबविणार ‘डोअर टू डोअर’ अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 16:09 IST

या अभियानात शहरातील १ लाख कुटुंबांच्या भेटीचे उद्दिष्ट ठरविले आहे.

ठळक मुद्दे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील दोन दिवस राहणार मुक्कामीअधिवेशनानंतर आ. सुजितसिंह ठाकूर राहणार औरंगाबाद मुक्कामी

औरंगाबाद : महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेनेला हिंदुत्वाच्या मुद्यांवर घेरण्यासाठी भाजप ‘डोअर टू डोअर’ अभियान राबविणार आहे. या अभियानात शहरातील १ लाख कुटुंबांच्या भेटीचे उद्दिष्ट ठरविले आहे. विधिमंडळाचे अधिवेशन संपताच आ. सुजितसिंह ठाकूर हे औरंगाबाद मुक्कामी असतील, तर आपण आठवड्यातील दोन दिवस औरंगाबादेत राहणार असल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी शनिवारी (दि.२८) दिवसभर संघटनात्मक बैठकांसह नागरिकांच्या भेटी घेतल्या. यात त्यांनी छोट्या-छोट्या समूहांच्या भेटीला प्राधान्य दिल्याचे दिसून आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि जनसंघाच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यात विविध विषयांवर चर्चा केली. त्यानंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर ‘औरंगाबाद फर्स्ट’ या सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत दीर्घ बैठक घेतली. या बैठकीत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी औरंगाबादच्या विकासाविषयीचा आराखडा मांडला. या आराखड्यातील काही मुद्यांचा समावेश भाजपच्या जाहीरनाम्यात करणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले.

या बैठकीनंतर शहरातील सुज्ञ नागरिकांची भेट एका पंचतारांकित हॉटेलात घेतली. यात उद्योग, शिक्षण, व्यापार, विधि, वैद्यकीय, बांधकाम आदी क्षेत्रांतील नामवंतांचा समावेश होता. त्या बैठकीतही त्यांनी भाजपला निवडून दिल्यास आपल्यातील काही जणांचा समावेश स्वीकृत नगरसेवक म्हणून करण्यात येईल. तसेच महापालिकेच्या सर्वसाधारण सभेचा अजेंडा ठरविण्यासाठी शहरातील विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या व्यक्तींची सल्लागार समिती केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

या दिवसभर घेतलेल्या विविध बैठकांनंतर भाजप पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलताना पाटील यांनी भाजप ही निवडणूक गांभीर्याने घेत असल्याचे सांगितले. विधिमंडळाचे अधिवेशन संपताच आ. ठाकूर हे निवडणूक संपेपर्यंत शहरात मुक्कामी राहतील. त्याच वेळी आपणही आठवड्यातील दोन दिवस औरंगाबादसाठी देणार आहोत. या दोन दिवसांमध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सोबत घेऊन ‘डोअर टू डोअर’ भेटी देणार असल्याचे त्यांनी सांगितले. या माध्यमातून भाजप एक लाख कुटुंबांना भेटणार आहे. या भेटीत संबंधित कुटुंबाची ख्याली-खुशाली विचारण्यासह शिवसेनेने केलेली गद्दारी, त्यांचे हिंदुत्व बेगडी असल्याचे दाखवून देण्यात येणार आहे. यातून भाजपच्या आगामी निवडणुकीतील रणनीती स्पष्ट आहे.

पदवीधर निवडणुकीवर लक्षमहापालिका निवडणुकीसोबत चंद्रकांत पाटील यांनी मराठवाडा पदवीधर निवडणुकीवरही लक्ष ठेवले आहे. या निवडणुकीचा आढावाही त्यांनी शनिवारच्या दौऱ्यात घेतला. उमेदवारीसाठी इच्छुक असलेले मतदार नोंदणीचे सहप्रमुख प्रवीण घुगे यांच्या कार्यालयाला भेट देऊन सूचनाही केल्या आहेत.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाElectionनिवडणूकchandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपाAurangabadऔरंगाबाद