नगरसेवकाला भाजपने केले निलंबित
By | Updated: December 5, 2020 04:08 IST2020-12-05T04:08:56+5:302020-12-05T04:08:56+5:30
विवाहाच्या ठिकाणी चोरी करणारे गजाआड नवी दिल्ली : विवाहाच्या ठिकाणी चोरी करणाऱ्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केले आहे. बँडबाजा बारात ...

नगरसेवकाला भाजपने केले निलंबित
विवाहाच्या ठिकाणी चोरी करणारे गजाआड
नवी दिल्ली : विवाहाच्या ठिकाणी चोरी करणाऱ्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केले आहे. बँडबाजा बारात या नावाने ही टोळी कुप्रसिद्ध आहे. सात जणांची ही टोळी समारंभाच्या ठिकाणी जाऊन चोरीत करीत असे. टोळीने काही मुलांना १० ते १२ लाख रुपयांच्या बोलीवर येथे आणले.
पित्याने मुलाला मारली गोळी
जयपूर : राजस्थानच्या बांसवाडा जिल्ह्यातील पाटन भागात पित्याने मुलाला गोळी मारून त्याची हत्या केल्याने खळबळ उडाली. पत्नीशी भांडण झाल्यानंतर त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. दोघांच्या भांडणात मुलाने आईची बाजू घेतल्याने पिता संतप्त झाला होता.
त्यानंतर होणार मंत्रिमंडळ विस्तार
बेळगाव : कर्नाटक मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत मागील अनेक दिवस चर्चा सुरू असून, कर्नाटक भाजप प्रभारी अरुण सिंह हे पक्षश्रेष्ठींचा कोणता संदेश आणतात यावर अवलंबून आहे, असे मुख्यमंत्री बी. एस. येदीयुरप्पा यांनी म्हटले आहे. नवीन प्रभारी प्रथमच राज्यात येत आहेत.