भाजपातर्फे पोलिसांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:02 IST2021-05-07T04:02:51+5:302021-05-07T04:02:51+5:30

वाळूज महानगर : पश्चिम बंगालमधील हिंसाचाराच्या विरोधात पश्चिम तालुका भाजपाच्या वतीने एमआयडीसी वाळूज पोलिसांना निवेदन देऊन सत्ताधारी टीएमसी कार्यकर्त्यावर ...

BJP statement to police | भाजपातर्फे पोलिसांना निवेदन

भाजपातर्फे पोलिसांना निवेदन

वाळूज महानगर : पश्चिम बंगालमधील हिंसाचाराच्या विरोधात पश्चिम तालुका भाजपाच्या वतीने एमआयडीसी वाळूज पोलिसांना निवेदन देऊन सत्ताधारी टीएमसी कार्यकर्त्यावर कारवाईची मागणी केली.

पश्चिम बंगालमधील निवडणूक प्रकिया संपल्यानंतर सत्ताधारी टीएमसीच्या कार्यकर्त्याकडून भाजपा कार्यकर्त्यांना लक्ष्य करून त्यांच्यावर हल्ले केले जात आहेत. सत्ताधारी टीएमसीच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करण्यात यावी, यासाठी भाजपाच्या वसंत प्रधान, पंचायत समिती सदस्य सतीश पाटील, विज सूर्यवंशी, फकीरचंद दाभाडे आदींनी पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांना निवदेन दिले आहे.

----------------------------

रांजणगावात गतिरोधकामुळे अपघाताचा धोका

वाळूज महानगर : रांजणगावात नागरी वसाहतीतील रस्त्यावर टाकण्यात आलेल्या गतिरोधकामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. गावात अनेक कॉलनीत ग्रामपंचायतीच्या वतीने सिमेंटचे पक्के रस्ते तयार करण्यात आले आहे. या रस्त्यावरून वाहनधारक सुसाट वेगाने वाहने चालवित असल्याच्या तक्रारीनंतर ग्रामपंचायतीने या रस्त्यावर ठिक-ठिकाणी गतिरोधक उभारले आहेत. या गतिरोधकांची उंची जास्त असल्याने दुचाकीस्वार घसरून पडत आहेत. याशिवाय अपघाताच्या घटनाही वाढल्याने हे सदोष गतिरोधक हटविण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे.

--------------------

महाराणा प्रताप चौकातील रस्ता उखडला

वाळूज महानगर : बजाजनगरातील महाराणा प्रताप चौकातील रस्ता ठिकठिकाणी उखडल्याने ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना आदळ-आपटीचा त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे, तीन वर्षांपूर्वीच या भागातील रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. प्रताप चौकातील या रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून रस्त्यावरील खडी व दगड निखळून पडत आहे. या रस्त्याची डागडुजी करण्याची मागणी संजय साळवे, नवनाथ थोरात, पवन काळे आदींनी केली आहे.

--------------------

उद्योगनगरीत टरबुजाचे भाव उतरले

वाळूज महानगर : वाळूज उद्योगनगरीत टरबुजाचे भाव उतरल्याने खरेदीदाराची गर्दी होत आहे. यंदा सर्वत्र समाधानकारक पाऊस झाल्याने तसेच गोदावरी नदीत मोठा जलसाठा असल्याने अनेकांनी टरबुजाचे उत्पादन घेतले आहे. सध्या कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने बाजारपेठा बंद असून टरबूजविक्रेते अडचणीत सापडले आहेत. बजाजनगर, पंढरपूर, रांजणगाव, वाळूज आदी भागात ग्रामीण भागातील शेतकरी टरबूज विक्रीसाठी घेऊन येत आहे. शेतकऱ्यांकडून प्रति ८ ते १० रुपये किलो दराने टरबुजाची विक्री केली जात असल्याने ग्राहकांची खरेदीसाठी गर्दी होत आहे.

------------------

महावितरणच्या कारभाराला ग्राहक कंटाळले

वाळूज महानगर : पंढरपुरात सतत वीजपुरवठा खंडित होत असल्याने ग्राहक महावितरणच्या गलथान कारभाराला कंटाळले आहेत. वीज ग्राहकांना पूर्वसूचना न देता वेळी-अवेळी वीजपुरवठा बंद केला जात असल्याचा आरोप वीज ग्राहकांतून केला जात आहे. सध्या कडक उन्हाळा सुरू असून लॉकडाऊनही असल्याने कुटुंबातील सदस्यही घरीच आहेत. मात्र, वीजपुरवठा सतत गायब होत असल्याने नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे.

------------------------------

Web Title: BJP statement to police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.